तिखट बुंदी (tikhat bundi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#अन्नपूर्णा #तिखट बुंदी (5)
#दिवाळी फराळ.

तिखट बुंदी (tikhat bundi recipe in marathi)

#अन्नपूर्णा #तिखट बुंदी (5)
#दिवाळी फराळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपबेसन पीठ
  2. 1/4 टीस्पूनहळद
  3. 1/4 टीस्पूनहिंग
  4. 1/2 टीस्पूनधने पावडर
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. चवीनुसार मीठ
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 10-12कढीपत्त्याची पाने
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    एका वाटी मध्ये बेसन पीठ चाळून घेणे.त्यात मीठ, लाल तिखट, हळद, धने पावडर,हिंग घालून मिक्स करावे.

  2. 2

    थोडे - थोडे पाणी घालून पीठ कालवून घेणे. जास्त पातळ किंवा घट्ट ही नको. 1 टेबलस्पून तेल घालून फेटून घ्यावे. 10 मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की बुंदीचा झारा घेऊन, त्यात पीठ थोडे घालून झारा आपटून बुंदी पाडून घेणे.(आपटताना काळजी घ्यावी. कढई सरकण्याची शक्यता असते.)

  4. 4

    शेवटी शेंगदाणे व कढीपत्त्याची पाने तळून बुंदीत घालावी. तिखट बुंदी तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes