झटपट मिनी उत्तपम. (mini uttapam recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#ब्रेकफास्ट #मंगळवार..
"एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी"..हो हो मी आजच्या मिनी रवा उत्तपमच्या बाबतीतच ही ओळ गातीये...त्याचं काय आहे ना..उपमा,शिरा,सांजा हे तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातले हक्काचे मेंबर्स..पण होत काय.."अती परिचयात अवज्ञा"होते कधीकधी..आपलेच चोचले ना....त्यात त्या उपम्याची काय चूक असा नंतर लख्ख प्रकाश पडतो डोक्यात.. ..मग चुकीचे क्षालन म्हणून मग मी या उपम्याला झटपट नवा अवतार ,नवा look देण्याचा प्रयत्न करते.. जसे आपण आपल्या नव्या लूकमध्ये, नव्या अवतारावर खुश असतो त्याचप्रमाणे हा उपमा,सांजा सुद्धा त्याच्या नव्या लुक वर किंवा त्यांचा नवा अवतार बघितल्यावर ,ते नवं रुपडं बघितल्यावर म्हणजेच रवा उत्तप्पम वर भारी खुश झालेत असं वाटतं मग..😍..आणि ते नवं रुपडं बघून मेरा भी दिल गार्डन गार्डन हो के गाने लगता है.."तू चीज बडी है मस्त मस्त"..😀😀
चला तर मग तुम्हालाही दाखवते हा नवा look..नवं version..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
4जणांना
  1. 2 कपरवा
  2. 1 कपदही
  3. मीठ चवीनुसार
  4. 1मोठा कांदा बारीक चिरून
  5. 1मोठा टोमॅटो बारीक चिरून
  6. 1 कपलाल पिवळी हिरवी सिमला मिरची बारीक चिरून
  7. 1गाजर किसून
  8. तेल उत्तपम वर सोडायला.
  9. चिमुटभरसोडा
  10. थोडे तिखट वरून भुरभुरवायला
  11. चटणी साठी
  12. 1/2 कपओलं खोबरं
  13. कोथिंबीर
  14. 1/2 इंचआल्याचे तुकडे
  15. मीठ चवीनुसार
  16. 1/2 टीस्पूनसाखर
  17. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  18. 3-4हिरव्या सिमला मिरचीचे तुकडे
  19. 1/2 टीस्पूनजीरे
  20. 4-5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  21. 1 इंचआल्याचे बारीक तुकडे
  22. 7-8कडिपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये रवा घेऊन त्यात दही घाला. आणि मिश्रण एकजीव करा नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून डोशासारखे बॅटर करून घ्या.

  2. 2

    तोपर्यंत सर्व भाज्यांचे बारीक तुकडे, हिरव्या मिरचीचे आल्याचे तुकडे करून घ्या कडिपत्त्याचे बारीक तुकडे करा आणि त्यात चिमूटभर मीठ घालून सर्व भाज्या एकत्र करा.कोथिंबीर घाला

  3. 3

    आता एका नॉन स्टिक पॅन वर तेल घाला.. रव्याच्या मिश्रणात चिमूटभर सोडा घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्याचे छोटे-छोटे उत्तप्पे पॅनवर घाला.. आता प्रत्येक उत्तपम वर थोड्या भाज्या घालून तेलाचा एक-दोन थेंब टाका आणि भाज्या व्यवस्थित press करून घ्या. आणि त्यावर एक मिनिटासाठी झाकण ठेवा. आणि खरपूस खमंग भाजा.नंतर पलटा आणि दुसऱ्या बाजूने ही तेलाचे तीन-चार थेंब टाकून खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे तयार झाले आपले झटपट मिनी उत्तप्पम..

  4. 4

    एका डिशमध्ये उत्तपम चटणीबरोबर सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes