मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका......

मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)

#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतुरीची डाळ वरण
  2. 1पाव मेथीची भाजी
  3. 1कांदा
  4. 1मोठे टोमॅटो
  5. 2 टेबलस्पूनहिरवा वाटाणा
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 3-4हिरव्या मिरच्या
  10. 5-6कढीपत्ता पाने
  11. 1/2 टीस्पूनमसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. लहानसा गुळाचा खडा
  14. 1 टेबलस्पूनतेल तडका देण्यासाठी
  15. 2लाल मिरच्या
  16. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  17. चिमुटभरहिंग

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    एक वाटी तुरीच्या डाळीचे वरण शिजवून घ्यावे. मेथी पाण्यामध्ये थोड्या वेळ बुडवून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि चिरून घ्यावी.

  2. 2

    आता गॅस सुरू करून त्यावर एक कढई ठेवावी. त्यात तेल टाकून नंतर त्यात जीरे मोहरी, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकावी. चांगले परतून घेतल्यावर त्यात, आले लसूण पेस्ट आणि हिरवा वाटाणा टाकून चांगले परतून घ्यावे..आणि टोमॅटो टाकावे.

  3. 3

    टोमॅटो परतून त्यात मसाला आणि हळद टाकावे. मेथीची भाजी टाकावी. आणि मिक्स करून घ्यावे. थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे.

  4. 4

    2 मिनिटांनी झाकण काढल्यावर, त्यात शिजलेले वरण टाकावे. चांगले एकत्र करून घ्यावे आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पातळ करण्यासाठी गरजेनुसार पाणी टाकावे. आणि चवी नुसार मीठ टाकावे.

  5. 5

    म्हणी त्याच प्रमाणे गुळाचा खडा टाकावा. आणि चांगले उकळू द्यावे. उकळल्यावर त्यात थोडी कोथिंबीर टाकावी. आता मेथीचे वरण तयार आहे. त्यात फक्त वरुन तडका द्यावयाचा आहे.

  6. 6

    त्यासाठी, तडका देण्यासाठी एका छोट्या कढईत 1 टेबलस्पून तेल, जीरे, मोहरी, हिंग आणि लाल मिरची टाकून चांगले कडकडीत गरम झाल्यावर तयार झालेल्या मेथीच्या वरणात टाकावे. मस्त मेथी तडका दाल जेवणासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes