पिझ्झा (pizza recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमैदा
  2. 1 कपदही
  3. 100 ग्राममोझिलोरा चीझ किसुन घेतलेले
  4. 2 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  5. 1 कपटोमॅटो केचप
  6. 1कांदा राउण्ड शेपमध्ये चिरलेला
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1टोमॅटो राउण्ड शेपमध्ये चिरलेला
  9. 2ढोबळी मिरची राउण्ड शेपमध्ये चिरलेला
  10. 10लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली
  11. 2 टेबलस्पूनमिक्स हर्बस
  12. 2 टेबलस्पूनचीली फ्लेक्स
  13. 2 टेबलस्पूनओरग्यानो
  14. मीठ चवीनुसार
  15. 2 टेबलस्पूनसाखर
  16. 1 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  17. 1/2 टेबलस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर 2 कप मैदामध्ये 1 कप दही,1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा, मीठ चवीनुसार आणि 1 टेबलस्पून साखर घालून पीठ चागलं मळून घ्या. गरज पडली तर थोडे पाणी घालून मिक्स चागलं मळून घ्या.

  2. 2

    त्याचानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून पीठ चागलं मळून घ्या. ये पिठ 1 तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवा.

  3. 3

    त्याचानंतर एका बाउलमध्ये 1 कप टोमॅटो केचप घ्या. नंतर त्यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली, 2 टेबलस्पून मिक्स हर्बस, 2 टेबलस्पून चीली फ्लेक्स, 2 टेबलस्पून ओरग्यानो, 2 टेबलस्पून काळी मिरी पावडर आणि 1 टेबलस्पून साखर घालून चागलं मिक्स करून घ्या. आता आपलं पिझ्झा सॉस तयार आहे.

  4. 4

    त्यानंतर गॅस वरती तवा ठेवा त्यामध्ये थोडे मीठ टाकून वरती झाकण ठेवून तवा 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवा.

  5. 5

    1 तासानंतर पिठाच्या जाड चपाती लाटून घ्या. लाटलेले चपाती एका प्लेटमध्ये थोडे पिठ टाकून त्यावरती तयार केलेले चपाती ठेवा. त्याचानंतर चपातीला फोर्क चमाचाने होल करून घ्या. नंतर त्याला पिझ्झा सॉस लावून घ्या. नंतर त्यावरती थोडे कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची लावून घ्या.

  6. 6

    नंतर त्यावरती किसुन घेतलेले मोझिलोरा चीझ टाका. त्यानंतर त्यावरती थोडे मिक्स हर्बस,ओरग्यानो आणि चीली फ्लेक्स टाका.

  7. 7

    आता तयार केलेले पिझ्झा बेस प्रीहिट करून घेतलेल्या तव्यावर ठेवून झाकण ठेवा. ये पिझ्झा बेक होण्यासाठी 15 ते 20 मिनिट ठेवा. 15 ते 20 मिनीटानंतर गॅस बंद करा. Pizza आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes