बॉम्बे-कराची हलवा (bombay karachi halwa recipe in marathi)

"बॉम्बे-कराची हलवा"
गोड पदार्थ आणि जत्रा याच समीकरणच आहे,बहुदा..! कारण जत्रा म्हटली की सर्वात जास्त दुकानं सजतात ती मिठाई आणि गोड पदार्थांची...!!
जत्रेतील माझा अजून एक आवडता पदार्थ,म्हणजे
" मुंबई -कराची हलवा " प्लास्टिक च्या छोट्या छोट्या शीट मध्ये गुंडाळलेला रंगीबेरंगी हलवा म्हणजे जत्रेचा आणि खास करून आम्हा लहान मुलांचा आवडता पदार्थ असायचा...!!
रंगीबेरंगी असल्यामुळे आमची नजर त्यावर लगेचच जायची, कधी एकदा हलवा फस्त करतोय असं व्हायचं..!!
मी अधून मधून हा हलवा घरी करते, कारण जसं माझ्या लहान पाणी मला हा हलवा आवडायचा, तोच आता माझ्या दोन्ही मुलांना हे फारचं आवडतो....👌👌
माझी लहान मुलगी तर जेली समजून हा हलवा आवडीने खाते, मला माझ्या लहानपणीची आठवण करून देते..☺️☺️

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका बाउल मध्ये कॉर्नफ्लोर आणि पाणी घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या,
- 2
त्या नंतर एका पॅन मध्ये साखर आणि पाणी घालून साखर वितळेपर्यंत आणि एक उकळी येऊन पाक थोडा चिकट होई पर्यंत शिजवून घ्या, त्या नंतर त्यात तयार कॉर्न फ्लोर चे मिश्रण घालून सतत ढवळत राहा,मिश्रण घट्ट होईल
- 3
मिश्रण घट्ट झालं की त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण सतत ढवळत राहा, (इथे मिश्रण सतत ढवळत राहणं गरजेचं आहे)आता या मिश्रणात चमचा भर तूप घाला आणि मिक्स करा, मिश्रणाला चकाकी येईल,आता 2 मिनिटांच्या अंतराने या मिश्रणात तूप घालत राहा,
- 4
त्या नंतर यात पिवळा रंग आणि थोडे ड्रायफ्रूट्स नि वेलचीपूड घालून मिक्स करा, मिश्रण बऱ्यापैकी तूप सोडू लागलं, आणि घट्ट झालं की मिश्रण एका पसरट भांड्यात काढून घ्या,वरून अजून थोडे ड्रायफ्रूट्स घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या सेट होऊ द्या
- 5
त्या नंतर तयार मिश्रणाच्या हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्या, आणि खायला तयार आहेत
"बॉम्बे-कराची हलवा"
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)