कलाकंद (kalakand recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#wd कलाकंद हि गोड रेसिपी मी माझ्या आईला समर्पित (Dedicate ) करते माझ्या आयुष्यात आई माझा पहिला गुरु आहे आपली आई च आपल्या जिवनात सगळ्यात जवळची खास व्याक्ति असते ती आपल्यावर प्रेम, लाड, व सतत आपली खुप काळजी करत असते मी माझ्या आईकडुनच खुप नवनविन चांगल्या गोष्टी शिकले तीचे सतत मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मी यशस्वी झाले तसेच जिवनात कठिण चांगले वाईट निर्णय स्वतःहा घेऊ शकले माझी आई खुप छान सुगरण आहे तिने बनवलेले गोड तिखट पदार्थ मी तीच्या कडुनच बघुन बघुन शिकले माझ्या आईचा असा नियमच होता की कोणताही पदार्थ हा शेवटी मी करून बघायचाच त्यामुळे मलाही सैंपाकाची आवड निर्माण झाली त्यात माझी आईBmc त प्रिन्सिपल होती त्यामुळे मी घरात मोठी असल्यामुळे जेवणाची जबाबदारी लवकर माझ्यावर पडली मी माझ्या दोन्ही मुलींनाही सर्व पदार्थ करायला शिकवले आहेत त्याही सुगरणी आहेत लहानपणा पासुन आईने आपले खाण्यापिण्याचे सर्व हट्ट पुरवले त्यामुळे आता माझी जबाबदारी म्हणुन आई माझ्याकडे राहायला आल्यावर मी तिच्या आवडीचे पदार्थ बनवुन( तिच्या हाताची सर नाहीच ) तीला खाऊ घालते आज माझ्या आईचे वय८७ आहे पण कितीही पाहुणे येवोत ती स्वतःहा सर्व गोडाधोडाचा तिखट सैंपाक बनवते
म्हणुनच आज मी माझ्या लाडक्या आईसाठी तीची आवडती ' कलाकंद ' रेसिपी बनवली आहे चला तर पाहुया रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ व्यक्ति साठी
  1. १०० ग्रॅम मिल्कमेड
  2. २५ ग्रॅम कोमट दुध
  3. 1/4 टीस्पूनवेलची जायफळ पावडर
  4. 1-2 टेबलस्पुनकाजु बदाम पिस्ता काप
  5. 1 टेबलस्पुनडेकोरेशन साठी गुलाबाच्या पाकळ्या
  6. 1 टेबलस्पुनसाजुक तुप
  7. १५० ग्रॅम पनीर किंवा छेना
  8. पणत्या व गणपतीचा फोटो

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कलाकंद साठी लागणारे साहित्य प्लेटमध्ये काढुन ठेवा पॅन गरम करून त्यात साजुक तुप गरम करा

  2. 2

    कढईतील गरम झालेल्या तुपात किसलेले पनीर टाका व सतत परतत रहा

  3. 3

    नंतर त्यात दुध टाकुन सतत परतत रहा

  4. 4

    दुध टाकुन सतत परतत मिश्रण थोडे शिजत आल्यावर त्यात मिल्कमेड टाका व परत ढवळत रहा नंतर त्यात वेलची जायफळ पावडर टाका

  5. 5

    वेलची व जायफळ पावडर मिक्स झाल्यावर परत सारखे परतत रहा

  6. 6

    सतत मिश्रण परतल्यामुळे पुढे त्याचा थोड़ा घट्ट गोळा तयार होऊन पॅन पासुन सुटायला लागेल तेव्हा थोडे तुप टाकुन परता

  7. 7

    लगेच तुप लावलेल्या टिनमध्ये मिश्रण काढुन थापुन घ्या त्यावर काजु बदाम पिस्त्याचे काप टाकुन चमच्याने दाबा व थंड होऊ दया नंतर त्याच्या पाहिजे त्या आकारात सुरीने वड्या पाडा

  8. 8

    पाडलेल्या वड्या ऐका प्लेट मध्ये लावुन गुलाब पाकळ्यांनी व काजु पिस्ता बदाम कापांनी डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes