मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#wd
#cooksnap
आज मी, माझी मैत्रिण मल्टीटॅलेंन्टेड शितल राऊत हीची ,'मड पाॅट व्हेज यखणी पुलाव ' ही रेसिपी बनवून पाहिली .
मातीच्या भांड्यात हा पुलाव केल्यामुळे ,काय अप्रतिम चव आलीय या पुलावला...😋😋
घरी सर्वांना फार आवडला ,माझी मुलगी रियाने तर मस्त ताव मारलाय या पुलाववर ..,😊
Thank you so much dear for this delicious recipe..😊🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
4  ते 5 सर्व्हि
  1. 200ग्राम बासमती तांदूळ धुुवुुन अर्धा तास भिजवलेेेेेले
  2. 400मिलिलिटर गरम पाणी
  3. 2टेबलस्पून तूप
  4. 1टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  5. 1मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा
  6. 1टीस्पून जीरे
  7. 3हिरव्या वेलच्या
  8. 1टीस्पून बडीशोप
  9. 1मसाला वेलची
  10. 2तेजपत्ता
  11. 1इंच दालचीनी
  12. 6-7काळीमिरी दाणे
  13. 1इंच दालचीनी
  14. 2हिरव्यामिरच्या उभ्या चिरून
  15. 1टेबलस्पून दही
  16. 1कप मिक्स भाज्या (मटार, फ्लॉवर, बटाटाफरसबी,गाजर)
  17. चवीनुसार मीठ
  18. 10ते 12 काजू

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    प्रथम पाॅटमध्ये तूप गरम करा.

  2. 2

    त्यामधे वरील सर्व खडे मसाले घालून हलकेच परतून घ्या. मी यामधे काजू सुद्धा तळून घेतले आहेत. व नंतर ते काजू काढून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात कांदा छान गुलाबीसर परतून घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या सुद्धा परतून घ्या.

  4. 4

    दही, चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या. व नंतर त्यात भाज्या घालून छन‌परतून घ्या.

  5. 5

    आता त्यात पाणी घालून मिक्स करा. झाकण ठेऊन उकळी येऊ द्या.जेणेकरून भाज्याही शिजतील आणि चविष्ट स्टाॅक तयार होईल.

  6. 6

    नंतर त्यात तांदूळ घालून‌ छान मिक्स करा. झाकण ठेऊन पुलाव 10 मि. छान शिजू द्या.

  7. 7

    आपला टेस्टी पुलाव खाण्यासाठी तयार...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes