उपवासाची भगर ची खांडवी /सुरळीची वडी (upwasachi bhagar chi khandvi recipe in marathi)

Smita Bhamre
Smita Bhamre @cook_29205341

#fr
उपवास असलाकी की साबुदाणा खिचडी, भगर आमटी नेहमीच केले जाते. आता ढोकळा, इडली, डोसे ही केले जातात. पण काही तरी वेगळे करून पाहावे म्हणून सहज ट्राय केलेली रेसिपी खूपच भन्नाट झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपभगर पीठ
  2. 1/4 कपसाबुदाणा पीठ
  3. 1/4 कपदही
  4. 1-1/4 कप पाणी
  5. मीठ
  6. लाल तिखट

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    एका कढईत दही घ्या त्यात पाणी टाकून फेटून घ्या.

  2. 2

    त्यात आता दोन्ही पीठ टाकून छान एकजीव करा. गुठळी राहता कामा नये.चवीनुसार मीठ टाका.

  3. 3

    आता कढई गॅस वर ठेऊन मंद आचेवर सतत ढवळत रहा. मिश्रण घट्ट झाले की झाकण ठेऊन एक वाफ घ्या.

  4. 4

    आता ताटाला मागीलबाजूस तेल लावा व मिश्रण पातळ पसरवून घ्या. गार झाले की सुरळीच्या वड्या करून घ्या.

  5. 5

    आता वरून लाल तिखट घालून छान सजवून आपल्या उपवासाच्या सुरळीच्या वड्या तयार झाल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Bhamre
Smita Bhamre @cook_29205341
रोजी

Similar Recipes