भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#ब्रेकफास्ट
#भगर उपमा
ब्रेकफास्टमधील आज माझी ही चौथी रेसिपी पाठवत आहे.
उपवास म्हंटलं कि साबुदाणा, शेंगदाणे, भगर यापासून बनणाऱ्या विविध पदार्थांची रेलचेल. उपवासाला काय करावं? सारखी खिचडी नको वाटते. परंतु उपवासाला बऱ्याचदा 'एकादशी अन् दुप्पट खाशी', असाच काहीसा प्रकार होतो. तर आज करूया भगरचा उपमा. खूप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-३० मि.
२-३ लोकांसाठी
  1. 1 वाटीभगर
  2. 1/4 वाटीशेंगदाणे
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. चतकोर लिंबाची फोड
  5. 1 चमचाजीरे
  6. 1 चमचासाखर
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 चमचेखोवलेले ओले खोबरे किंवा सुके किसलेले खोबरे सजावटीसाठी
  9. 2-3 चमचेतेल
  10. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

२५-३० मि.
  1. 1

    साहित्य

  2. 2

    प्रथम भगर साफ करून घेणे. तूपावर भाजून घेणे. शेंगदाणे भाजून भरड करून घ्यावेत. कढईमध्ये तेल घालून गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालावे, ते तडतडले की हिरवी मिरचीचे काप घालावेत.त्यावर भरड केलेले शेंगदाणे घालावेत.

  3. 3

    दिड ग्लास पाणी घालावे. साखर, मीठ, लिंबूरस घालावा. एक उकळी येवू द्यावी. नंतर त्यामध्ये भगर घालावी. झाकण ठेवावे मंद आचेवर पाच मि. ठेवावे. एकदा हलवावे.

  4. 4

    पुन्हा झाकण ठेवून २-३ वाफा आणाव्यात. आता भगर खूप छान उमलेल. एका प्लेटमध्ये काढून खोबरे घालून सजवावे व सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes