* सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#GA4 #Week26 #भेळ ह्या किवर्ड नुसार मी इथे साधी सोपी पण झटपट तयार होणारी कमी साहित्यात रेसिपी शेअर करत आहे. ही जरी विदाउट चटणी असली तरी रुचकर लागते.उन्हाळ्यात असे हलके फुलके छान वाटते. चटण्या हव्याच असे नाही.असे कोरडे टाईमपास खाणे मुलांना अधे मध्ये खायला लागतेच तेव्हा देता येते. मुले व आपण दोघेही खुश राहतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

8-10 मिनिटं
1 सर्व्हिन्ग
  1. 11/2 कपकुरमुरे
  2. 1/2 कपफरसाण विथ शेव
  3. 3 टीस्पूनतेल
  4. 2-3 टीस्पूनबारीक चिरून कोथिंबीर
  5. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  6. 1/2 टीस्पूनतिखट
  7. चवीनुसारसैंधव मीठ

कुकिंग सूचना

8-10 मिनिटं
  1. 1

    कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.कुरमुरे भाजून कुरकुरीत करून घ्यावे. मग एका बाउल मध्ये काढावे.

  2. 2

    त्यात वरून मीठ, चाट मसाला, तिखट, तेल कच्चेच घालावे म्हणजे मसाला छान मिळून येतो व कुरमुऱ्यांना लागतो. तो वेगळा रहात नाही वा खाली बसत नाही. हे आवर्जून लक्षात घ्यावे. माग त्यास छान मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    आता वरून फरसाण ऍड करून त्यात कोथिम्बिर घालून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    ही यम्मी, टेस्टी * सुकी भेळ * तयार आहे खायला. एका बाउलमध्ये वरून शेव व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. मुलांना तर अतिशय आवडते. आणि हलकी असल्याने त्रास नाही होत व त्याना असेच चटपटीत पण हलके टाईमपास खाणेच हवे असते. त्यामुळे आया पण खुश मुले ही खुश. कमी वेळ व कमी खर्चात हेल्दी खाणे घरचे मिळते. सर्व दृष्टीने ही फायदेशीर ठरते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

Similar Recipes