दही वडा (dahi vada recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#rbr
#रक्षाबंधन_स्पेशल_रेसिपी चॅलेंज

"दही वडा"
माझ्या भावाला माझ्या हातचा,मी बनवलेला दहीवडे खुप आवडतात..मग कालचा मेनू दही वडा होता..

दही वडा (dahi vada recipe in marathi)

#rbr
#रक्षाबंधन_स्पेशल_रेसिपी चॅलेंज

"दही वडा"
माझ्या भावाला माझ्या हातचा,मी बनवलेला दहीवडे खुप आवडतात..मग कालचा मेनू दही वडा होता..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
पाच सहा
  1. 1/2 किलोउडीद डाळ
  2. चिमुटभरकाळे मीठ वड्यांसाठी व चिमुटभर दह्यामध्ये घालण्यासाठी
  3. 1 किलोदही
  4. 1/4 कपसाखर
  5. चवीनुसारमीठ
  6. तेल तळण्यासाठी
  7. 1 टेबलस्पूनजिऱ्याची भरड किंवा जीरे पूड

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या व त्यात पाणी घालून चार पाच तास भिजत ठेवा

  2. 2

    डाळीतले पाणी निथळून घ्या व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या..पाणी न वापरता. आता छान पाच मिनिटे फेटून घ्या.साध मीठ,काळे मीठ, जीरे भरड घालून मिक्स करा व परत फेटून घ्या..

  3. 3

    बॅटर चांगले फेटून घेतले की वडे छान हलके,फ्लपी होतात.

  4. 4

    कढईत तेल गरम करून त्यात गोल गोल भजी सारखे बॅटरचे गोळे टाकून मिडीयम गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्या.दह्यामध्ये साखर घालून मिक्स करून फेटून घ्या व फ्रिजमध्ये एक तास आधीच ठेवावे..

  5. 5

    पातेल्यात एक लिटर पाणी कोमट करून त्यात वडे दहा मिनिटे ठेवा व दोन्ही हाताने प्रेस करत त्यातील पाणी काढून टाका व प्लेटमध्ये काढून घ्या.. सर्व्हिंग प्लेटमध्ये वडे ठेवून त्यावर दही घालून वरून हिरवी चटणी,चिंचेची आंबटगोड चटणी घालावी.वरुन थोडे लाल तिखट भुरभुरावे व बारीक शेव भुरभुरावी व सर्व्ह करावे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes