अक्की रोटी (akki roti recipe in marathi)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#FD हॉस्टेल म्हटलं की समस्त आई मंडळी आपापल्या छोट्या (?) मुलाबाळांच्या काळजीने हैराण होतात. सिनीअर्स चं टेन्शन, नवीन जागा, हॉस्टेल चं वातावरण, अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची सोय अशा एक ना अनेक गोष्टींची चिंता त्यांना होत असते.
माझं शिक्षण कर्नाटकात झाले पण तरीही मी मात्र ह्या बाबतीत बरीच भाग्यवान ठरले. सुरुवातीचे ७-८ महिने सोडले तर मला इतका त्रास काढावा लागला नाही.
मेसवाल्या काकूंच्या हातची कागदापेक्षा पातळ भाकरी, सुसला, पड्डू, सज्जी रोटी, अक्की रोटी, बेण्णे डोसा, कट भजी, डाळ्याच्या पीठाचे खमंग लाडू आणि त्याचेच सारण भरून केलेल्या करंज्या अशा खास कन्नडिगा पदार्थांची चव जिभेवर अजूनही कायम आहे. आजही कधी कधी असे स्पेशल पदार्थ केले की मन हॉस्टेलमध्ये फिरून येते.
अक्की म्हणजे तांदूळ. सोप्या शब्दांत सांगायचं तर अक्की रोटी म्हणजे तांदळाच्या पीठाचे थालीपीठ! ही रोटी महाराष्ट्रीयन थालिपीठापेक्षा खूपच सौम्य वेगळ्या चवीची तसेच कमालीची क्रिस्पी असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण १५ - २० मिनिटे
२ ते ३ जणांना
  1. 2 वाट्यातांदूळ पीठ
  2. 1 मूठभरखवलेलं ओलं खोबरं
  3. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  4. 7हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. मूठभरबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. मूठभरकिसलेलं गाजर
  7. मूठभरबारीक चिरलेला कोबी
  8. 2 चमचेभाजून भरडलेले जीरे
  9. मीठ चवीनुसार
  10. मळण्यासाठी पाणी
  11. तांदूळ पीठ जर जुनं असेल तर १ मूठभर मैदा किंवा गव्हाचे पीठ
  12. रोटी भाजण्यासाठी अगदी थोडे तेल

कुकिंग सूचना

साधारण १५ - २० मिनिटे
  1. 1

    सगळे पदार्थ पीठामध्ये घालून मिक्स करावे.

  2. 2

    साधारण थालिपीठा च्या पीठा प्रमाणे हवे तितके पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि १० मिनिटे रेस्ट करावे.

  3. 3

    एक सुती कापड किंवा रूमाल ओला करून पोळपाटावर पसरवून त्यावर तयार पीठाचा गोळा ठेवावा. पाण्याचा हात लावत लावत गोळा पसरवून थालिपीठ बनवावे.

  4. 4

    हवे तितके पातळ झाल्यावर रूमाल अलगद उचलून गरम तव्यावर उलटा करावा.

  5. 5

    वरून पाणी शिंपडून रूमाल हळूच थालिपीठापासून सोडवावा. कडांना थोडे तेलाचे थेंब सोडून वरून झाकण ठेवावे.

  6. 6

    २-३ मिनिटात जेव्हा चर्र् आवाज येईल तेव्हा झाकण काढून थालीपीठाच्या कडा सोडवून घ्याव्यात. झाकण लावल्याने वरची बाजू कच्ची राहत नाही त्यामुळे ती बाजू भाजण्याची आवश्यकता नाही.

  7. 7

    तयार अक्की रोटी / थालिपीठ हे पांढरे लोणी, दही, शेंगा चटणी, कारळ्याची चटणी किंवा खोबर्याच्या गोळा चटणी सोबत खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
शर्वरी पवार - भोसले
रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

Similar Recipes