ढाबा अंडा मसाला (dhaba anda masala recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cooksnap
आज दुपारच्या जेवणासाठी मी Nilan Raje यांची पाककृती cooksnap केली आहे :)
थोडा माझ्या पद्धतीने ट्विस्ट दिला आहे :)

ढाबा अंडा मसाला (dhaba anda masala recipe in marathi)

#cooksnap
आज दुपारच्या जेवणासाठी मी Nilan Raje यांची पाककृती cooksnap केली आहे :)
थोडा माझ्या पद्धतीने ट्विस्ट दिला आहे :)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 4अंडी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 इंचआलं
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. कढीपत्त्याची पानं
  7. 1तिखट मिरची - २ कमी तिखट हिरव्या मिरच्या
  8. कोथिंबीर
  9. 1/2 वाटीओलं खोबरं
  10. 2 चमचेधणे
  11. 1 चमचापांढरे तीळ
  12. 4काळीमिरी
  13. 4लवंगा
  14. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  15. 1मोठी मसाला वेलची
  16. चिमूटभरहळद
  17. 2 चमचेघरचा मसाला
  18. 1 चमचाजिरेपूड
  19. 1 चमचाधणेपूड
  20. 1 चमचाकाळा मसाला
  21. 1/2 चमचागरम मसाला
  22. चवीपुरतं मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    ४ अंडी उकडवून घेतली.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं, लसूण पाकळ्या, कोथिंबीर बारीक चिरून घेतलं.

  3. 3

    कढई मध्ये तेल गरम करून त्यात एक एक करत चिरलेला ऐवज परतून घेतला. धणे, लवंग, काळीमिरी, दालचिनी, चवीपुरतं मीठ यात ऍड केल. त्यात खोबरं टाकून मिश्रण छान परतून घेतलं. मग गॅस बंद करून थंड करत ठेवलं. थन्ड झालं कि हे भाजलेलं वाटण मिक्सर लावून, कोथिंबीर घालून भरडसर वाटून घेतलं.

  4. 4

    उकडलेली अंडी कापून, तेलावर परतून घेतली. वरून थोडे तीळ भुरभुरवले.

  5. 5

    फ्राय केलेली अंडी बाजूला काढून त्याच भांड्यात अजून तेल वाढवत गरम करत ठेवलं. तेल गरम झालं कि त्यात चिमूटभर हळद, २ चमचे घरचा मसाला, एक चमचा जिरेपूड, एक चमचा धणेपूड, एक चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला टाकला. मसाले तेलावर फुटले कि त्यात मिक्सर मधलं वाटण टाकलं. तेलावर परतून त्यात फ्राय केलेली अंडी ऍड केली. थोडावेळ झाकण ठेवून मसाला अंड्यांमध्ये मुरू दिला.

  6. 6

    मस्त गरमागरम चपातीसोबत खायला अंडा मसाला तयार. :)

    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes