मटार करंजी (matar karanji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#hr #होळी स्पेशल मटार करंज्या एकदम खुसखुशीत नी सगळ्यांना आवडणार्या कमी साहित्यात होणार्या. चला तर मग रेसिपी बघुयात.

मटार करंजी (matar karanji recipe in marathi)

#hr #होळी स्पेशल मटार करंज्या एकदम खुसखुशीत नी सगळ्यांना आवडणार्या कमी साहित्यात होणार्या. चला तर मग रेसिपी बघुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. स्टफींग साठी भाजी👇
  6. 1 कपमटार
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनधणेपुड
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 2हिरव्या मिरच्या
  13. 4-5लसुण पाकळ्या
  14. 1/2 इंचआल
  15. 1 टेबलस्पूनतेल भाजीसाठी
  16. 1/2 टीस्पूनमीठ
  17. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    प्रथम 1कप मैदा व 1टेबलस्पून बारीक रवा घ्या त्यात दोन टेबलस्पून कडकडीत गरम तेल घाला नि चांगले चोळून घ्या.हळू हळू पाणी टाकून पुरीपेक्षा थोडे घट्ट मळून घ्या नि 20मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    आल लसुण मिरची जाडसर वाटून घ्या. आता कढईत 1टेबलस्पून तेल घाला नि त्यात 1टीस्पून जीरे घाला जीरे फुलले कि आलमिरचीलसुण चा ठेचा घाला,हिंग घाला नंतर धणेपुड,गरम मसाला,हळद घाला परता नि नंतर मटार घाला नि मटार वाफेवर शिजवून घ्या.

  3. 3

    मटार शिजला कि मीठ,खोबरे,कोथिंबीर घाला नी एक वाफ आणावी.आपले स्टफींग तयार आहे.

  4. 4

    पारी साठी पिठ तयार आहे परत मळून घ्या नि पुरी एव्हढा गोळा घ्या नि पुरी लाटून करंजी स्टफींग भरा कडेला पाणी लावून करंजी बंद करा.अश्या सर्व करंज्या करून घ्या.ह्या साहित्यात साधारण 12करंज्या होतात.

  5. 5

    कढईत तेल मंद गॅसवर तापत ठेवणे व तापले कि करंज्या मध्यम आचेवर ब्राऊन होईस्तो तळून घेणे.

  6. 6

    मस्त खुसखुशीत मटार करंजी तयार आहे.सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes