हेल्दी पोहे मखाना चिवडा (Healthy Pohe Makhana Chivda Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#घरी मुलांना सतत काहीतरी चटपटीत खायला हव असतच सतत बाहेरच पॅकेट मधील खाण न देता घरातच हेल्दी पदार्थ देण्याकडे आईचा सतत प्रयत्न असतो चला तर आज हेल्दी पोहे मखाना चिवडा रेसिपी आपण बघुया

हेल्दी पोहे मखाना चिवडा (Healthy Pohe Makhana Chivda Recipe In Marathi)

#घरी मुलांना सतत काहीतरी चटपटीत खायला हव असतच सतत बाहेरच पॅकेट मधील खाण न देता घरातच हेल्दी पदार्थ देण्याकडे आईचा सतत प्रयत्न असतो चला तर आज हेल्दी पोहे मखाना चिवडा रेसिपी आपण बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. 1 टीस्पून चाट मसाला
  2. 1/2 टीस्पून मिरपुड
  3. 1 टीस्पून काळ मीठ
  4. 1टीस्पून साखर
  5. चविनुसार मीठ
  6. 2-3 टेबलस्पुन तेल
  7. २०० ग्रॅम मखाने
  8. ६०० ग्रॅम पातळ पोहे
  9. ३० ग्रॅम शेंगदाणे
  10. 1 टीस्पून हळद
  11. ३० ग्रॅमकाजु
  12. ३० ग्रॅम बदाम
  13. ३० ग्रॅम डाळे
  14. 1-2 टेबलस्पुन बेदाणे
  15. 4-5हिरव्या मिरच्या
  16. 20कडिपत्याची पाने

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पातळ पोहे उन्हात वाळवुन घ्या

  2. 2

    चिवड्या साठी लागणारे शेंगदाणे, काजु, बदाम काढुन ठेवा

  3. 3

    पोहे व मखाने वेगवेगळे भाजुन परातीत काढुन ठेवा

  4. 4

    मोठ्या कढईत तेल गरम करून शेंगदाणे, बदाम, काजु तळुन घ्या नंतर त्याच तेलात डाळे व बेदाणे तळुन घ्या

  5. 5

    सर्व तळलेले पदार्थ भाजलेल्या पोह्यावर टाकुन घ्या

  6. 6

    त्याच उरलेल्या तेलात बारीक चिरलेल्या मिरच्या कडिपत्ता हळद काळ मीठ चाटमसाला मिरपुड टाकुन ही फोडणी पातेल्यात घेतलेल्या पोहे मखाना ड्रायफ्रुटवर टाका व मिक्स करा नंतर आवश्यक ते प्रमाणे मीठ साखर मिक्स करा आपला हेल्दी चिवडा रेडी

  7. 7

    तयार हेल्दी पोहे मखाना चिवडा काचेच्या वाटी मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes