बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#gp
गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
बासुंदी खरंतर मला माझ्या माहेरी चुलीवर केलेली बासुंदी आवडते पण सध्या अमेरिकेत असल्याने मी खूप सारे मिस करतं आहे त्यातील बासुंदी एक आहे.
माझ्याकडे मोठं जाड बुडाचं पातले एक आहे त्यात 2 लिटर दूध बसतं त्यामुळे मी 1 लिटर फुल फॅट दूध आणि 1/2 लिटर evaporated milk वापरले आहे जर तुमच्याकडे मोठं पातले असेल /कमी बासुंदी करायची असेल तर तुम्ही फक्त फुल फॅट दूध वापरले तरी चालेल. मी बारीक गॅसवर बासुंदी केली आहे याचे कारण पातेल्याच्या खाली लागत नाही आणि ऊतू जात नाही आता पाहू रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरफुल फॅट दूध
  2. 1कपापेक्षा थोडी कमी साखर
  3. 10-12काजू तुकडे
  4. 4-5बदाम
  5. 5-6पिस्ते
  6. 1/2 टेबलस्पूनचारोळी
  7. 1 टीस्पूनजायफळ वेलची पूड
  8. 6-8केशर काड्या
  9. पुरीसाठी
  10. 1 कपकणीक
  11. 1 टेबलस्पूनबेसन
  12. 1 टेबलस्पूनरवा
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. चवीनुसारमीठ
  15. 1/2 कपदूध+1/2 कप पाणी
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    पातेले स्वच्छ धुवून निथळून घेतले त्यामध्ये 1 लिटर फुल फॅट दूध घालून उकळी आली की गॅस बारीक करुन घ्या एका वाटीत केशर काड्या घालून त्यात गरम दूध घालून बाजूला ठेवालं.

  2. 2

    काजू बदाम पिस्ते यातील प्रत्येकी 1/2 बाजूला काढून ठेवावे आणि बाकीच्या याचे काप करून घेतले साखर मोजून घ्या.अधूनमधून दूध हलवत रहावे बाजूला लागलेली साय मिक्स करावी आता दूध आटून 1/2 झाले की यात evaporated milk साखर काजू बदाम पिस्ते काप चारोळी आणि वाटीतील केशर काड्या घातलेलं दुध घालून एकत्र करावे.

  3. 3

    आता आपल्यामुळे आणि केशर काड्या मुळे बासुंदीचा रंग बदलला असेल.काजू बदाम पिस्ते खलबत्त्यात घालून कुटून घ्यावे (हवंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे) (बासुंदीच्या पातेल्यात एक बशी घातली तर ती ऊतू जात नाही)

  4. 4

    कुटलेले काजू बदाम पिस्ते बासुंदीमध्ये घालून एकत्र मिक्स करावे यामुळे बासुंदी घट्ट होण्यासाठी मदत होते.(साधारणपणे 1&1/2 तासात बासुंदी तयार होते) आता 4-5 वेलची सोलून पूड करून घ्यावी जायफळ किसून घ्यावे आणि वेलची जायफळ पूड बासुंदी मध्ये घालून एकत्र करावे आणि गॅस बंद करावा. 15-20 मिनिटांनी बासुंदी सर्व्ह करू शकता जर जास्त क्रिमी बासुंदी हवी असल्यास 2-3 फ्रीजमध्ये ठेवावे आणि गार बासुंदी गरम पुरी बरोबर सर्व्ह करावे.

  5. 5

    परातीत कणिक बेसन रवा साखर मीठ घालून एकत्र करावे आता हळूहळू दूध आणि पाणी यांचे मिश्रण घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा आणि तेल लावून 10-15 मिनिटे झाकून ठेवा.तयार पीठाची पोळी लाटून गोल कट करुन घ्या.

  6. 6

    तेल गरम करून पुरी तळून घ्या आणि देवाला नैवेद्य दाखवून बासुंदी पुरी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes