केसर वेलची जायफळ श्रीखंड (kesar elaichi jayfal shrikhand recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#gp सण म्हणजे गोड पदार्थ हवाच त्यात गुढीपाडवा हा उन्हाळ्यात येणार सण उष्णतेपासुन शरीराला थंडावा व आराम मिळावा म्हणुन श्रीखंडाचे सेवन केले तर शरीर ताजेतवाने होते. श्रीखंडातील दही, ड्रायफ्रुट, केसर, वेलची, जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत त्यातील कॅल्शियम दात मजबुत व निरोगी करतात. हाडे मजबुत होतात. " बी" जिवनसत्वामुळे चांगली झोप, नितळ त्वचा, मऊ लवचिक त्वचा, केसांची निगा, वजन कमी करण्यात फायदेशीर, इम्युनिटी वाढते. रोगप्रतिकार शक्ति वाढते. ड्रायफ्रुट ने शरीराला प्रोटीन मिळते. वारंवार भूक लागत नाही असे अनेक फायद्यामुळे ह्या दिवसात दही, श्रीखंड खाणे आवश्यकच आहे. चला तर अशा केसरयुक्त श्रीखंड कसे बनवायचे ते आपण बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

नाही
२-४ जणांसाठी
  1. 10पिस्ता
  2. २-४ केसराचे धागे
  3. ५०० ग्रॅम दही (घरी विरजलेल )
  4. ३० ग्रॅम साखर
  5. 1 टीस्पूनकेसर सिरप
  6. 1 टीस्पूनवेलची जायफळ
  7. 1-2 टेबलस्पुनचारोळी
  8. 10बदाम
  9. 10काजु

कुकिंग सूचना

नाही
  1. 1

    दही ऐका सुती कापडाच्या रुमालात बांधुन ४-५ तास उंच ठिकाणी बांधुन ठेवा त्यातील सर्व पाणी निघुन गेल्यावर असा चक्का मिळतो. मिक्सर जारमध्ये साखर वेलची जायफळ मिक्स करून पिठिसाखर करून घ्या

  2. 2

    तयार चक्का ऐका मोठ्या बाऊलमध्ये काढुन घ्या त्यात तयार केलेली पिठिसाखर मिक्स करा व चमच्याने४-५ मिनिटे चांगले फेटा

  3. 3

    नंतर त्यात केसरसिरप मिक्स करून परत फेटुन घ्या श्रीखंड स्मूथ होई पर्यत

  4. 4

    त्यात थोडे ड्रायफ्रुट टाकु शकता श्रीखंड २-३ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा

  5. 5

    थंडगार केसर वेलची जायफळ श्रीखंड प्लेट मध्ये ठेवुन वरून केसरा चे धागे काजु, पिस्ता, बदामाच्या बारीक कापांनी तसेच काजु, बदामांनी डेकोरेट करा व बाप्पाला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवा सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes