बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#kr
बाजरी ही उष्ण असल्याने ही खीचडी सहसा हिवाळ्यात करतात. पण एरवी पण आपण करू शकतो. हि खीचडी चमचमीत, अतिशय टेस्टी, व ती कढी आणि लसणाच्या तिखटा बरोबर खुपचं अप्रतिम लागते.

बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

#kr
बाजरी ही उष्ण असल्याने ही खीचडी सहसा हिवाळ्यात करतात. पण एरवी पण आपण करू शकतो. हि खीचडी चमचमीत, अतिशय टेस्टी, व ती कढी आणि लसणाच्या तिखटा बरोबर खुपचं अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४5 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपकांडलेली बाजरी
  2. 1/4 कप तांदूळ
  3. 1 टेबलस्पूनचणा डाळ
  4. 1 टेबलस्पूनचवळी
  5. 1 टेबलस्पूनतुरडाळ
  6. १+१/२ टेबलस्पून मुगडाळ
  7. 2कांडी लसुण
  8. 2 इंचआलं
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. १+१/२ टेबलस्पून शेवभाजी मसाला
  11. 1 टीस्पूनकच्चा मसालाा
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 1 टेबलस्पूनतिखट
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. १०-१५ कढीपत्ता पाने
  17. 1तमालपत्र
  18. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  19. मीठ चवीनुसार
  20. लसणाच्या तिखटासाठी..
  21. १-१/२ कांडी लसुण
  22. 2 टेबलस्पूनतेल
  23. 1 टेबलस्पूनतिखट
  24. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

४5 मिनीटे
  1. 1

    प्रथम बाजरी स्वच्छ धुऊन थोडा वेळ ठेवून दिली. ती थोडीशी गार असतांनाच फूड प्रोसेसर मधून फिरवून तिचा कोंडा काढला. व नंतर रात्री किंवा करण्यापूर्वी ६-७ तास बाजरी तसेच चवळी, चणाडाळ, तूर डाळ पाण्यात भिजत घातले. व सकाळी खिचडी करण्यापूर्वी अर्धा तास आधी तांदूळ व मुग डाळ भिजवून ठेवली. असे केल्याने खिचडी चांगली शिजून घोटली जाते.

  2. 2

    आता आलं बसून यांची मिक्सरवर पेस्ट करून घेतली मग गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता, तमालपत्र, हिंग, हळद व आलं-लसूण पेस्ट टाकून छान परतून घेतले.

  3. 3

    मग त्यात तिखट, शेव भाजी मसाला, कच्चा मसाला, थोडा गरम मसाला टाकून परतले.निथळलेली बाजरी, चवळी, तूर डाळ व चना डाळ टाकून परतून घेतले. नंतर त्यात तांदूळ व मुगाची डाळ घालुन परतले.

  4. 4

    वरील सर्व मिश्रण चांगले परतून झाल्यावर त्यात गरम पाणी ओतले. ते साधारण मिश्रणाच्या तीन ते साडेतीन पट पाणी लागते. मग उकळी आल्यावर त्यात मीठ घातले. व ते मिश्रण कुकर मध्ये ओतून चांगले चार पाच शिट्ट्या करून शिजवून घेतले.

  5. 5

    कुकरमध्ये बाजरीची खिचडी शिजेपर्यंत तिखट करून घेतले. त्यासाठी दीड कांडी लसूण बारीक कापून घेतला. व कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात मंद गॅसवर लसुन परतला. सतत हलवत रहावे म्हणजे लसून सगळीकडून सारखा परतला जातो.

  6. 6

    लसुन गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात तीळ घालुन परतले. व तीळ तडतडल्यावर लसुन थोडा ब्राऊन झाल्यावर खाली उतरवून मग त्यात तिखट व मीठ मिक्स केले. म्हणजे तिखट जळत नाही व लसणाच्या तिखटाला छान लाल कलर येतो. ते एका वाटी मध्ये काढून घेतले.

  7. 7

    मग कढी करुन घेतली. व कुकरची वाफ गेल्यावर बाजरीची खिचडी घोटून घेऊन बाउल मध्ये काढली व वरून लसणाचे तिखट व कोथिंबीर घातली.

  8. 8

    तयार बाजरीची खिचडी लसणीचे तिखट व कढी बरोबर गार्निश करून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes