गुळपापडी (Gud Papdi Recipe In Marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#Cooksnap
# वर्षा देशपांडे ह्यांची रेसिपी cooksnap केली आहे .म्हणजे करते मी माझ्या आईसारखी अंदाजे पण आज त्यांच्यासारखी केली आहे छान झाली आहे.फक्त खोबरे नव्हते म्हणून थोडा काजू तुकडा नि तिळ वापरले आहेत .

गुळपापडी (Gud Papdi Recipe In Marathi)

#Cooksnap
# वर्षा देशपांडे ह्यांची रेसिपी cooksnap केली आहे .म्हणजे करते मी माझ्या आईसारखी अंदाजे पण आज त्यांच्यासारखी केली आहे छान झाली आहे.फक्त खोबरे नव्हते म्हणून थोडा काजू तुकडा नि तिळ वापरले आहेत .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
5/6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाचे जाड पीठ
  2. 3/4 कपतुप
  3. 1 कपगुळ
  4. 1/2 चमचावेलचीपुड
  5. 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  6. 1 टेबलस्पूनतीळ
  7. 1 टेबलस्पूनबारीक काजू तुकडा

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    तिळ नी काजू तुकडा भाजून घेणे नी ते ज्या थाळीत गुळ पापडी थापणार त्यात पसरवून घेणे.

  3. 3

    आता कढईत तुप टाकून पीठ भाजायला घेणे.साधारण 15 मिनीटात पीठ भाजून होईल.

  4. 4

    पीठ भाजून झाले कि त्यात वेलचीपुड,जायफळ पूड टाका नि नंतर चिरलेला गुळ घाला हलवत मिसळून घ्या. साधारण 4/5मिनीटात गुळ विरघळला कि गॅस बंद करा.

  5. 5

    हे मिश्रण तयार तयार केलेल्या थाळीत ओता नि सारखे करून घ्या. थोडे थंड झाले कि वड्या कापून घ्या.

  6. 6

    मस्त गुळ पापडी, आपला पारंपारिक लहानपणीचा मधल्या वेळचा खाऊ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes