पौष्टीक बिट सुप (beet soup recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#goldenapron3 #Beetroot बीट खाल्यामुळे शरीराला उर्जा मिळते थकवा कमी होतो ब्लड शुगर लेवल कमी होते खराब कोलेस्ट्रॉल कमी होते असे बीटाचे भरपुर फायदे आपल्याला मिळतात म्हणुन आपल्या आहारात बीटचा उपयोग नेहमी केला पाहिजे चला आज बिटाचे पौष्टीक सुप कसे करायचे बघु या चला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनटे शिजण्य
२ व्यक्ति साठी
  1. ५० ग्रॅम बिटाचे पिस
  2. ३० ग्रॅम टमाॅटो चे पिस
  3. २० ग्रॅम गाजराचे पिस
  4. 2टेबल स्पुन गुळ पावडर
  5. 3-4लवंगा
  6. 2-3काळी मिरी
  7. 1/2टिस्पुन जिरे
  8. 1तमालपत्र
  9. 1दालचिनी चा तुकडा
  10. 1टेबलस्पुन कॉर्न फ्लॉवर
  11. चविनुसार मिठ

कुकिंग सूचना

२० मिनटे शिजण्य
  1. 1

    बिट गाजर ट मॅटो चे पिसेस करून मिक्सर मधुन बारीक करून घ्या लवंग काळीमिरी जिर कुटुन जाडसर पावडर करून ठेवा

  2. 2

    पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा उकळी आल्यावर तमालपत्र दालचिनी चा तुकडा टाकुन उकळवा नंतर बिटाची जाडसर पेस्ट पाण्यात टाका

  3. 3

    नंतर त्यात कुटलेला मसाला टाका व १० मिनिटे उकळवा

  4. 4

    नंतर सर्व मिश्रण चाळणीने दुसऱ्या पातेल्यात गाळुन घ्या व गरम करायला ठेवा

  5. 5

    सुप मध्ये गुळ पावडर व मिठ टाका

  6. 6

    बिट सुप मध्ये कॉर्नफ्लावर ची पेस्ट करून टाका उकळी आल्यावर आपले सुप रेडी

  7. 7

    रेडी सुप बाऊल मध्ये सर्व्ह करा पुदिन्याच्या पानांनी डेकोरेट करा गरमा गरम टेस्टी सुप रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद अंकिता मॅडम🙏

Similar Recipes