हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#सूप
सध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते.

हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

#सूप
सध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 5मोठे लाल टोमॅटो
  2. 1गाजर
  3. 2पाकळ्या लसूण
  4. 1/2इंचापेक्षा कमी आलं
  5. 1तेजपत्ता
  6. 1 टेबलस्पूनबटर
  7. 1कांदा
  8. 1 टीस्पूनकाळी मिरी पूड
  9. चवीनुसारमीठ
  10. ब्रेड क्रुटोन्स (आवडत असल्यास)
  11. थोडीशी क्रीम सजावटीसाठी

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    सर्व प्रथम टोमॅटो तुकडे करून घ्या. त्यानंतर गाजराचे सुद्धा तुकडे करून घ्या. कांद्याचे उभे काप करून घ्या. लसूण सोलून घ्या. आल्याचे तुकडे करून घ्या.

  2. 2

    आता एका कढई मधे बटर गरम करून त्यामध्ये आलं, लसूण फ्राय करून घ्या. त्यामध्ये 1 तेजपत्ता टाका. थोडसं फ्राय झाल्यावर त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि गाजर टाकून परतून घ्या. आता पाणी टाकून व्यवस्थित शिजू द्या. पूर्ण पाणी आटे पर्यंत शिजवायचं आहे.

  3. 3

    पाणी आटले की त्यातून तेजपत्ता काढून टाकायचा. आता हे टोमॅटोच मिश्रण मिक्सरला लावायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक पेस्ट करून घ्या.

  4. 4

    आता आपल्याला त्याची फोडणी करायची आहे.त्यासाठी थोडं बटर घेऊन बटर मध्ये काळीमिरी टाका. आणि टोमॅटोचा वाटलेले मिश्रण टाका. त्यानंतर एक उकळी यायला द्या. पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजेस्ट करा. अशा प्रकारे तयार होईल,आपलं टोमॅटो सूप. सूप सर्व्ह करताना वरून थोडीसी क्रीम टाका. ब्रेड क्रुटोन्स बरोबर खायला द्या. ब्रेड क्रुटोन्स करताना ब्रेडचे चौकोनी छोटे छोटे तुकडे व मटर मध्ये बारीक गॅसवरती क्रुटोंस शालो फ्राय करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या (2)

Similar Recipes