चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक #week5
#पावसाळीगम्मत
बाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
६-७ जण
  1. चिकन मॅरीनेट करण्यासाठी
  2. १-१/४ किलो चिकन
  3. 1/2 टिस्पून आलं लसूण पेस्ट
  4. 1 टिस्पून मालवणी मसाला
  5. मीठ
  6. वाटणासाठी :
  7. 2कांदे उभे चिरलेले
  8. 1नारळ खवलेला
  9. 1/2सुक्या खोबऱ्याची वाटी कीसलेली
  10. १" आलं
  11. 6-7लसूण पाकळ्या
  12. खडा मसाला (मिरी, लवंग, दालचिनी, खसखस, धने)
  13. चिकन बनविण्यासाठी :
  14. १०० ग्राम तेल
  15. 2कांदे बारीक चिरलेले
  16. 1दालचिनी तूकडा
  17. कढीपत्ता
  18. 3-4 टिस्पून मालवणी मसाला
  19. 1 टिस्पून आलं लसुन पेस्ट
  20. 1 टिस्पून धनेजिरे पावडर
  21. गरम पाणी जरुरीनुसार
  22. मीठ चवीनुसार
  23. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम वाटणासाठी : कढईत कांदा परतून थोडं तेल घाला त्यात सुकं खोबरं किसलेलं घालून परता नंतर खडा मसाला व आलं लसूण घालून परता, आता त्यात खवलेलं ओलं खोबरं घालून लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या. थंड झालं की मिक्सरमध्ये वाटा.

  2. 2

    मॅरीनेशनसाठी चिकन स्वच्छ धुवून घ्या त्याला आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ लावून १ तास झाकून ठेवा.

  3. 3

    कढईत तेल घालून त्यात कढीपत्ता, दालचिनी, कांदा चिरलेला टाकून लालसर होईपर्यंत परता. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, धनेजिरे पावडर, हळद घालुन परता. त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालुन परता व झाकण ठेवून मंद गॅसवर ५ मिनिटे शिजवा. नंतर गरम पाणी घालून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे शिजवा.

  4. 4

    चिकन अर्धवट शिजलेलं असतानाच वाटण घाला व परत चिकन शिजेपर्यंत शिजवा. सर्व्ह करताना वरून कोथींबीर भुरभरा. मस्त गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes