आंबोळी विथ कैरीची कोकणी चटणी (amboli with kairichi kokani chutney recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

आंबोळी विथ कैरीची कोकणी चटणी (amboli with kairichi kokani chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कप तांदूळ
  2. 1/4 कप उडदाची डाळ
  3. १+१/२ टेबलस्पून जाड पोहे
  4. 1 टेबलस्पूनचणा डाळ
  5. 1 टीस्पूनधणेे
  6. 1/2 टीस्पूनमेथ्या
  7. मीठ चवीनुसार
  8. कैरीची चटणी
  9. 1/2कैरीची चटणी
  10. 1कांदा
  11. 3हिरव्या मिरच्या
  12. 1 इंचआलं
  13. 4-5लसूण पाकळ्या
  14. 4 टेबलस्पूनओला नारळ
  15. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तांदूळ व दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन घेतले त्यात मेथ्या, धणे, पोहे मिक्स करून पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले.

  2. 2

    सकाळी ते सर्व मिक्सरच्या जार मधून थोडे त्यात पाणी घालून फाईन पेस्ट करून घेतले. व हे मिश्रण सहा-सात तास झाकून ठेवले. ते मिश्रण चांगले फेटून त्यात मीठ घालून घेतले.

  3. 3

    आता कैरीची चटणी तयार करण्यासाठी कैरी कांदा चिरून घेतले. लसूण सोलून घेतला.व वरील सर्व चटणीचे साहित्य मीक्सरच्या जारमधे घालून मिक्सर वर वाटून घेतले. व तयार चटणी वाटी मधे काढून घेतली.

  4. 4

    आता आंबोळीचे आंबवलेले पीठ घेऊन ते एकदा हलकेच फेटून घेतले. व गॅस वर पॅन गरम करून ग्रीसिंग केले व डावाने पीठ घालून ते हलकेच थोडेसे पसरवले. आंबोळी थोडी जाडच असतात. त्यामुळे ते जास्त पसरवा चे नाही व दोन्ही बाजूंनी शिकून घ्यायचे.

  5. 5

    तयार कोकणातली स्पेशल आंबोळी व कोकणी गावरान कैरीची चटणी दोन्ही एका डिशमध्ये ठेवून सर्व्ह केले. एकदम टेस्टी व पचनाला हलकी अशी डीश तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes