भेंडी पोकळ्या ची भाजी (bhendi poklyachi bhaji recipe in marathi)

#KS1
कोकण म्हटलं कि पोकळ्याची म्हणजेच चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून लागतेच,गणपतीत तर नैवेद्यासाठी भेंडी आणि पोकळा हा हवाच पारंपरिक रित्या बनविली जाणारी ही भाजी चावीला खूप छान लागते.मी इथे फक्त एकच भेंडा घातला आहे मुलांसाठी,पण ह्या भाजीत भेंडी आणि पोकळा सारखंच घेऊन भाजी बनविली जाते,गावी गेल्यावर ही भाजी खाण्यात ली मजा काही औरच!! चला तर मग पाहुयात भेंडी पोकळ्याची पाककृती.
भेंडी पोकळ्या ची भाजी (bhendi poklyachi bhaji recipe in marathi)
#KS1
कोकण म्हटलं कि पोकळ्याची म्हणजेच चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून लागतेच,गणपतीत तर नैवेद्यासाठी भेंडी आणि पोकळा हा हवाच पारंपरिक रित्या बनविली जाणारी ही भाजी चावीला खूप छान लागते.मी इथे फक्त एकच भेंडा घातला आहे मुलांसाठी,पण ह्या भाजीत भेंडी आणि पोकळा सारखंच घेऊन भाजी बनविली जाते,गावी गेल्यावर ही भाजी खाण्यात ली मजा काही औरच!! चला तर मग पाहुयात भेंडी पोकळ्याची पाककृती.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कढईत तेल तापवून मग त्यात हिरवी मिरची घालावी.
- 2
मग चिरलेला भेंडा घालून थोडा चिकटपणा कमी झाला कि त्यात पोकळ्याची भाजी घालावी, त्यात हिंग, हळद घालून एकजीव करून घ्यावे. आणि भाजी शिजू द्यावी.
- 3
आता भाजी शिजतं आल्यावर त्यात मीठ आणि खोवलेले नारळ घालून ग्यास बंद करावे.
- 4
चला तर मग कोकण स्पेशल भेंडी पोकळ्याची भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi)
#रानभाज्याआजची रानभाजी आहे कोरला. कोरल्याची भाजी थायरॉईडवर उत्तम. या भाजीची पाने चिंचेच्या पानासारखी/लाजाळूच्या पानासारखी असतात, त्या भाजीची पुढची कोवळी टोक खुडून घ्यायची. ही भाजी चिरताना बुळबुळीत लागते. काहीजण यात भेंडी घालूनही भाजी बनवतात. याची पातळ आमटी, वड्याही करतात. या भाजीत थोडा चिंचेचा कोळ घालणे. चवीला ही भाजी मला भेंडीच्या भाजीसारखीच लागली. Deepa Gad -
-
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
"पौष्टिक बीटरूट ची भाजी" (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
" पौष्टिक बीटरूट ची भाजी " सध्या माझीच तब्बेत बिघडली आहे, रक्तामधील आर बी सी कमी झालेत, आणि त्या करता सध्या औषधां बरोबर डाएट वर पण थोडा जोर देतेय, जेणेकरून तब्बेतीमध्ये लवकर सुधारणा होईल. असो....!!! सध्याच्या डाएट मध्ये रक्त आणि रक्ताशी निगडित घटक वाढवण्याला प्राधान्य देते आहे, आणि बीट रूट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या साठी....!!म्हणून ही भाजी वरचे वर माझ्या आहारात असते. आणि सर्वांनीच ती खावी असा माझा आग्रह समजा....❤️अगदी बेसिक भाजी आहे, पण खूप पौष्टिक आहे. Shital Siddhesh Raut -
शेवग्याच्या पानांची भाजी (shevgyachya pananchi bhaaji recipe in
कोकणात जन्माष्टमी च्या दिवशी काळ्या वाटण्याची उसळ, आंबोळ्या यांच्या जोडीला एक वेगळीच भाजी केली जाते ती म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी. चवीला इतर पालेभाजीसारखीच ही पण भाजी. थोडी तुरट, कडवटपण असते. पण या भाजीचे औषधी गुणधर्म खूप आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, मॅग्नेशियम, लोह असे अनेक घटक असतात. तसेच मुबलक अँटीऑक्सीडेंट पण असतात. चला तर ही भाजी कशी बनवायची ते बघूया. Sanskruti Gaonkar -
-
-
बटाटा भेंडी भाजी (batata bhendi bhaji recipe in martahi)
#श्रावण_स्पेशल_ कुकसॅन्प_चॅलेज#श्रावण_स्पेशल_भाजी#cooksnap*Sanhita Kand* यांची बटाटा भेंडी भाजी कुकसॅन्प केली. थोडासा बदल केला. पण चवीला उत्तम झाली भाजी. Thank you so much for this recipe 🙏🏻 🙏🏻अगदी झटपट होणारी आणि तेवढीच सात्विकतेने परिपूर्ण असलेली भाजी..यात मी कांदा घातला नाही. घरी मुलीला आवडत नाही म्हणून.. पण तुम्हाला आवडत असल्यास नक्की घाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. Poonam Joshi -
चंदन बटवा ची ताक भाजी (chandan batva chi taak bhaji recipe in marathi)
#GR#गावाकडील ताक भाजीचंदन बटवा ही भाजी तशी दुर्मिळ .पण याची पौष्टिकता लक्षात घेता ही भाजी खाल्ली पाहिजे असे माझी आजी म्हणायची व गावी गेलो की हमखास खाऊ घालायची. Rohini Deshkar -
बटाटा भेंडी भाजी
#Goldenapron3 week15 याकोड्यामध्ये भेंडी या घटकाचा उल्लेख आहे. ह्या भेंडीची अजून एक चटपटीत टेस्ट मी आपण भाजी बघूया. आमच्याकडे ही भेंडी बटाटा भेंडी फारच आवडते सगळ्यांना. आमच्याकडे ही भेंडी बटाटा भाजी बराच वेळा बनवतो. चला तर मग बघुया या झटपट बनणाऱ्या भेंडी बटाटाभाजीची रेसिपी. Sanhita Kand -
-
-
खमंग भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_रेसिपीज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चॅंलेंज#Seasonal_Vegetable#भेंडी_भाजी.. पावसाळ्यात आमच्याकडे वसई,विरारहून आकाराने लांब अशी गावठी भेंडी येते तसंच गौरींच्या वेळेस पोपटी रंगाची लांब भेंडी येते..तर कधीकधी अगदी बुटक्या भेंड्या पण विकायला येतात..भेंड्या कशाही असोत..त्याची आठवड्यातून दोन वेळा भाजी करायचीच असते..हा नियम लागू आहे आमच्या घरी..😜कारण मी आणि धाकटा मुलगा अगदी भेंडी प्रेमी आहोत..मग मी आलटून पालटून वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी करते ..😀पण सर्वात आवडती म्हणजे फक्त मीठ ,मिरची, आलं ,कोथिंबीर ,थोडं जास्त तेल घालून लोखंडाच्या कढईत केलेली भेंडीची भाजी..अगदी स्वर्गसुखच आम्हां दोघांसाठी..😍😋..चला बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा सांगतेच कशी..😀 Bhagyashree Lele -
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
चवळीची भाजी (CHAVALICHI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#स्टीमचवळी ची भाजी माझ्या आवडीची भाजी ही भाजी जेवणात असली की जेवण मस्त होत साधे जेवण मन तृप्त होवून जाते Maya Bawane Damai -
चवळीची भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
नागपुरी स्टाईल मध्ये चवळीची भाजी Pallavi Maudekar Parate -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
ब्राह्मी ची भाजी (bharmichi bhaji recipe in marathi)
ब्राह्मी ची भाजी पौष्टिक आणी शक्तीवर्धक आहे. बाजारात दिसली तर आवर्जून आणा आणी भाजी बनवून खा. SONALI SURYAWANSHI -
दह्यातली भेंडी (dahyatil bhendi recipe in marathi)
#भेंडीही भाजी माझी आई नेहमी बनवते. आज त्या भाजीत थोडासा बदल करून बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Ashwini Vaibhav Raut -
फुलकोबी ची भाजी (fool kobichi bhaji recipe in marathi)
#trending_recipe#फुल कोबीची भाजीही भाजी नॉर्मली सर्वांना आवडते. त्यामुळे खूप डिमांड आहे. आजची भाजी खास डब्यात देण्यासाठी आहे.मी ऑफिस मध्ये असताना कोबीची भाजी बरेचदा न्यायची. Rohini Deshkar -
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_भाजी "अंबाडी ची भाजी"मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चवळीची उसळ भाजी रेसिपी (chavdi chi usad bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीची उसळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपिबुक #week5#पावसाळी मज्जा#कोकणातिल प्रसिद्ध असलेली टाकळ्याची भाजी ही पावसाळी भाजी ही भाजी पावसाळ्यात मिळते चलातर बघुया कशी करायची ते रेसिपि पुढीलप्रमाणे . Sangeeta Kadam -
चवळीची पालेभाजी (Chavlichi palebhaji recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी चवळीची पालेभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. उन्हाळयात पालेभाजी खाण्यास योग्य आहे.चवळीची भाजी खूप पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेपूची डाळ भाजी (sepuchi dal bhaji recipe in marathi)
#GR#गावरानरेसिपीज# शेपूशेपूची डाळ भाजी ही माझ्या सासूबाईची रेसिपी. आमचा खूप मोठा परिवार आणि घरातील परिस्थिती ही बेताचीच. कमावणारी व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे 12. त्यामुळे घरात कुठलीही पालेभाजी आली कि, ती भाजी सर्वांना कशी पुरेल याचा जास्त विचार केला जायचा. शेपूची भाजी आमच्याकडे सर्वांच्या आवडीची भाजी. सुकी भाजी केली तर ती खूप थोडी होते. एवढ्या लोकांना ती पूरणार कशी... मग यावरचा हा तोडगा....मग काय शेपुची डाळ भाजी घरात बनविली जायची. त्याच्या सोबत चुलीवर भाजलेल्या मिरच्या, हाताने ठेचलेला कांदा, ज्वारीचे पापड आणि गरमागरम भाकर आणि वाफाळलेला भात..आहाहा... काय तो गावरान बेत... अप्रतिमतेव्हा नक्की ट्राय करा *शेपुची डाळभाजी*💃 💕 Vasudha Gudhe -
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrकमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
फुलगोबी ची भाजी (phulgobi chi bhaji recipe in marathi)
#GA4#week10#keyword-cauliflowerफुल गोबी ची भाजीCauliflower म्हणजेच फुल गोबी याची झटपट होणारी भाजी ज्यात कांदा लसूण वापरलेला नाही....देवाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणारी सुकीभाजी.... Shweta Khode Thengadi -
लाल चवळी च्या घुगऱ्या (lal chavdi chya ghugrya recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीघुगऱ्या ही पाककृती कोकणातील पारंपरिक पाककृती आहे. जेव्हा घरात भाजी नसेल किंवा आपल्याच शेतातील कडधान्य म्हणून वाल, बारीक लाल चवळी यांची अशप्रकारे भाजी केली जात, रात्री कडधान्य भिजत घालून मग भिजल्यावर ते शिजवून घ्यायचे,मग त्यातील पाणी काढून घ्यायचे ते पाणी आमटी किंवा इतर भाजी साठी वापरले जात, अशप्रकारे सगळे साहित्य घालून सुखी भाजी बनविली जात त्याला घुगऱ्या म्हणत, चला तर बनवू या बारीक लाल चवळी च्या घुगऱ्या. Shilpa Wani -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi
More Recipes
टिप्पण्या (6)