रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#rr

कमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते‌...😊
पाहूयात रेसिपी.

रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#rr

कमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते‌...😊
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ हि.
3 सर्व्हिंग्ज
  1. २५० ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून,पुसून घ्यावी
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 1/2 कपफेटलेले दही
  5. 1/2 टेबलस्पूनबेसन
  6. 1 टीस्पूनधणे पावडर
  7. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2हिरवी मिरची चिरून
  10. मीठ चवीनुसार
  11. जीरे
  12. आलं लसूण पेस्ट
  13. कोथिंबीर
  14. तेल

कुकिंग सूचना

२५ हि.
  1. 1

    भेंडीचे दोन भाग करून त्यावर थोडंसं लाल तिखट,मीठ,बेसन घालून छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    पॅनमधे तेल गरम करून त्यात ह्या भेंडी ५ मि.कुरकुरीत न होता फ्राय करून घ्यावेत. बाजूला काढून ठेवा.

  3. 3

    त्यात पॅनमधे तेल गरम करून त्यात जीरे, मिरची,आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या.नंतर त्यात वरील सर्व मसाले घालून परतून घ्या.

  4. 4

    नंतर टोमॅटो घालून छान स्मॅशरने मॅश करा. नंतर त्यात थोडे पाणी घालून मिक्स करा. व ३ मि. छान शिजू द्या.

  5. 5

    नंतर त्यात दही,मीठ फ्राय केलेली भेंडी घालावी.छान मिक्स करून ५ मि. शिजू द्या. तेल सुटेपर्यंत शिजवावे.

  6. 6

    शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes