फ्युजन मटकी उसळ (fusion mataki usal recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

मटकीची उसळ म्हणजे आमच्या घरी जीव की प्राण! पण इथे बारामुल्ला मध्ये मटकीच मिळत नाही! मग पुण्याहून मागवली. पण थंडी इतकी की कोणत्याही प्रकारे छान मोडच येत नाहीत.
आपल्याकडे प्रत्येक दुकानात मिळणारी मोडाची मटकी आठवली, घरीसुध्दा किती छान मोड येतात ते आठवलं. असो.
आता म्हटलं रेसिपी थोडीशी फ्युजन पद्धतीने करू आणि झाली ना हिट!
चला तर पाहूया #फ्युजन #मटकी #उसळ रेसिपी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ माणसे
  1. 1 मोठी वाटी मटकी
  2. 1 मोठा कांदा
  3. 1 मोठा टोमॅटो
  4. 1/4 चमचामोहरी
  5. 1/4 चमचाजीरे
  6. 1/4 चमचाहिंग
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1 चमचाकांदा लसूण मसाला
  9. 1/2आले- लसूण पेस्ट
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. 3-4 वाट्यापाणी
  12. 1/2लिंबू
  13. 1 मोठा चमचाकोथिंबीर
  14. 1 मोठा चमचातेल
  15. ८-१० कढीपत्त्याची पाने
  16. 1 चमचाधनेजिरेपूड
  17. 1/4 चमचागरम मसाला

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    मटकी स्वच्छ धुवून कोमट पाण्यात रात्रभर भिजत घालावी. मग पाणी उपसून ठेवावी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून ठेवावे.

  2. 2

    कुकर मध्ये तेल तापले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून जरा ब्राऊन होऊ द्यावा. मग त्यात टोमॅटो घालून चांगला परतावा. आता त्यात आले- लसणीची पेस्ट घालून परतावी. मग मटकी परतून त्यात मीठ आणि १ वाटी पाणी घालून ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

  3. 3

    थंड झाल्यावर झाकण उघडून मटकी थोडी घोटून घ्या. आता त्यात कांदा लसूण मसाला, किंचित मीठ, १-१½ वाटी पाणी, कढीपत्ता, धणेजिरे पूड, गरम मसाला घालून १० मिनिटे उकळावे. लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी.

  4. 4

    खायला तयार आहे #फ्युजन #मटकी #उसळ! पोळीबरोबर सर्व्ह करा किंवा भाताबरोबर, मात्र गरमागरम हवी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes