वाटाण्याची उसळ (vatanyachi usal recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#pcr
प्रेशर कुकर म्हणजे आपल्या गृहिणी साठी एक वरदानच आहे.
उसळ किंवा मिसळ म्हणजे कुठलेही कडधान्य शिजण्यासाठी कुकर हा एक उत्तम पर्याय आहे पटकन लगेच दहा मिनिटात शिजतात.
कुकर हा सगळ्या पदार्थांसाठी ऑल-इन-वन आहे

वाटाण्याची उसळ (vatanyachi usal recipe in marathi)

#pcr
प्रेशर कुकर म्हणजे आपल्या गृहिणी साठी एक वरदानच आहे.
उसळ किंवा मिसळ म्हणजे कुठलेही कडधान्य शिजण्यासाठी कुकर हा एक उत्तम पर्याय आहे पटकन लगेच दहा मिनिटात शिजतात.
कुकर हा सगळ्या पदार्थांसाठी ऑल-इन-वन आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
पाच सहा
  1. वटाणे
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 6-7 लसूण पाकळ्या
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. 2 चमचेखोबरा कीस
  7. 1 इंचअद्रक
  8. 5-6 कढीपत्त्याची पाने
  9. कोथिंबीर
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 2 टीस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 1 टीस्पूनधना जिरा पावडर
  14. चवीपुरतं मीठ
  15. 2-3 टेबलस्पून तेल
  16. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  2. 2

    वाटाणे रात्रभर किंवा सात आठ तास भिजत ठेवावे नंतर ते प्रेशर कुकर ला लावून घ्यावे व दोन तीन शिट्ट्या करून घ्यावे म्हणजे वाटाणे छान शिजतात व पटकन शिजतात

  3. 3

    नंतर लसूण अद्रक मिरची खोबरा कीस घेऊन खलबत्त्यात कुटून घेणे किंवा मिक्सरला लावले तरी चालेल मसाले सर्व घेऊन घेणे

  4. 4

    भाजीचा कुकर घेऊन गॅस वर ठेवावा त्यात तेल टाकून जीरे मोहरी घालावी कढीपत्ता टाकावा नंतर कांदा घालावा कांदा गुलाबी झाला कि टोमॅटो घालून घ्यावा थोडा वेळ शिजू द्यावा

  5. 5

    टोमॅटो शिजला कि त्यात आद्रक लसुन खोबरा कीस व मिरचीची पेस्ट टाकून घालावी नंतर त्यात लाल तिखट हळद गरम मसाला धने जीरे पावडर सर्व मसाले टाकून घ्यावे

  6. 6

    थोडं थोडे पाणी घालावे नंतर त्यात शिजलेले वाटाणे टाकावे

  7. 7

    पाच मिनिटे होऊ द्यावे झाले आपली वाटाण्याची उसळ तयार कोथिंबीर घालून चपाती सोबत किंवा भातासोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes