गौरी स्पेशल कथली (kathli recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

विदर्भ स्पेशल कथली
#KS3

कथली हा एक विदर्भातील पारंपारिक पदार्थ आहे याचे वैशिष्ट्य असे आहे की भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी ला म्हणजेच गौरीला दुसऱ्या दिवशी जेवणात याचा प्रसाद केला जातो. या प्रसादाला खूप महत्व व तितकाच मान असतो.आंबील सोबत कथली ही महालक्ष्मीला घरोघरी बनविली जाते तितक्याच आवडीने व भक्तीने खाल्ली जाते.
मी हा गौरीचा प्रसाद आहे म्हणून यात लसुण टाकले नाही तुम्हाला जर तसेच खायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण बिना लसणाचे खूप छान अप्रतिम लागते व यासाठी आंबट ताक घ्यावे त्यामुळे चव खूप छान लागते.
याचे अजून एक वैशिष्ट्य ही खराब होत नाही दुसऱ्या दिवशी याची चव अजूनच छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
चार
  1. 1दुधी भोपळा
  2. 1 वाटीबेसन
  3. आंबट ताक
  4. 1/2 टेबलस्पूनकिसलेले आले
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबलस्पूनजीरे
  9. 1 टेबलस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनतिखट
  11. 1 टेबलस्पूनधने पावडर
  12. हळद
  13. चवीनुसारमीठ
  14. पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे

  2. 2

    दुधी भोपळा स्वच्छ धुऊन त्याचा किस करून घेणे

  3. 3

    नंतर ताक एका बाउल मध्ये घेऊन त्यात बेसन टाकून मिक्स करून घेणे बेसनाचे गुठळी राहिली नाही पाहिजे

  4. 4

    एक भांडे घेऊन गॅस वर ठेवावे तेल टाकावे जीरे मोहरी टाकून तडतडले की त्यात मिरची कढीपत्ता कोथिंबीर घालून घ्यावे अद्रक किसून घालावेअर्धा चमचा हळद घालावी नंतर त्यात दुधीचा कीस घालावा व चांगला परतावा

  5. 5

    परतले की त्यात तिखट हळद धने पावडर व मीठ घालून घ्यावे व परतावे व दुधीचा कीस पाच मिनिटे झाकण ठेवून चांगला शिजवून घ्यावा तेलातच शिजवावा पाणी टाकू नये

  6. 6

    आता यात बेसन व ताकाचे मिश्रण टाकावे चांगले ढवळून घ्यावे बेसनाच्या गुठळ्या होऊ देऊ नये

  7. 7

    सतत हलवत राहावे नाहीतर खाली बुडी लागते व गुठळ्या होतात पाच मिनिटांनी शिजली की घट्ट होते झाली आपली कथली तयार वरतून कोथिंबीर घालून खायला द्यावी

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes