नागपूर स्पेशल संत्रा बर्फी (santra burfi recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

विदर्भ स्पेशल
झटपट होणारी अशी ही संत्र्याची ही बर्फी आहे.
#KS3

नागपूर स्पेशल संत्रा बर्फी (santra burfi recipe in marathi)

विदर्भ स्पेशल
झटपट होणारी अशी ही संत्र्याची ही बर्फी आहे.
#KS3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिटे
१० जणांसाठी
  1. 3संत्री
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 चमचासाजूक तूप
  4. 1/2 वाटीदूध
  5. 1/2 वाटीदूध पावडर
  6. 4-5बदाम व पिस्ता
  7. 1 वाटीडेसिनेट कोकोनट
  8. 2 चमचेऑरेंज फूड कलर

कुकिंग सूचना

३५ मिनिटे
  1. 1

    प्रथम संत्री सोलून त्यातील फोडीतील बिया व वरील आवरण काढून घेतले. सर्व संत्र्याच्या प्लक काढून घेतला.

  2. 2

    मग पॅन ठेवुन त्यात दूध ओतले त्यात साजूक तूप ऍड केले व गॅस चालू करून मध्यम आचेवर ठेवला. त्यात साखर वितळवून घेतली मग त्यात दूध पावडर ऍड केली हे मिश्रण चांगल 5 ते 8 मिनिट ढवळून घेतल.

  3. 3

    मग त्यात ऑरेंज / संत्र्याचा प्लक ऍड केला. व तो 5 ते 7 मिनिट शिजवून घेतला. मग त्यात ऑरेंज फूड कलर ऍड केलं. मग चांगलं ढवळून घेतल्या वर त्यात डेसिनेट कोकोनट ऍड केलं पुन्हा ढवळून घेतलं.सारख मिश्रण ढवळत राहायचं नाही तर पॅन ला चिटकू शकत. सर्व मिश्रण पूर्णपणे सुकल्यावर गॅस बंद करावा.

  4. 4

    ५ मिनीट त्यावर झाकण ठेवून मग एका डब्या किंवा मोल्ड मध्ये ते मिश्रण काढावे. व त्यावरून बदाम व पिस्ता ची काप पसरावी व स्पचुला च्या मदतीने काप दाबावी.

  5. 5

    2 ते 3 तासांनी ह्या बर्फीची काप करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes