आंब्याचं रायतं (ambyach raita recipe in marathi)

#amr कोकणात आंब्याच्या मोसमात कैरीचे आणि आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. त्यातीलच एक "रायतं", चवीला आंबट गोड असतं आणि साध्या जेवणाची लज्जत वाढवणारं म्हणून आंब्याच्या मोसमात एकदा तरी रायतं हमखास बनवलं जातं.
आंब्याचं रायतं (ambyach raita recipe in marathi)
#amr कोकणात आंब्याच्या मोसमात कैरीचे आणि आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. त्यातीलच एक "रायतं", चवीला आंबट गोड असतं आणि साध्या जेवणाची लज्जत वाढवणारं म्हणून आंब्याच्या मोसमात एकदा तरी रायतं हमखास बनवलं जातं.
कुकिंग सूचना
- 1
आंब्यांची साल काढून घ्यायची. गर सुरीने काढून घ्यायचा.
- 2
कढईत तेल गरम करून मोहरी - जिरं - हिंग - हळदीची फोडणी द्यायची. फोडणी तडतडली कि त्यात २ लाल सुक्या बेडगी मिरच्या, १ चमचा अक्खे धणे, १ चमचा बडीशेप, २-३ लवंगा, ३-४ काळी मिरी, ३-४ कढीपत्ता पाने घालायचे. तेलावर सगळे घटक परतून घ्यायचे.
- 3
या फोडणीत किसले खोबरं घालून भाजून घ्यायचं.
- 4
खोबरं भाजलं कि त्यात एक वाटी पाणी घालायचं. त्यात १ चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालायचं.
एक उकळी काढून त्यात दोन्ही आंबे कोय आणि गरासकट ऍड करायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. ढवळून झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. झाकणावर पाणी ठेवायचं. अधे मध्ये झाकण उघडून ढवळून घ्यायचं. - 5
आमटी घट्ट झाली गॅस बंद करून ठेवून द्यायचं. आम्हाला वाफाळत्या भातासोबत आंब्याचं रायतं खूप आवडतं. :)
~ सुप्रिया घुडे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंब्याचं रायतं (ambyach raita recipe in marathi)
#कोकणकोकणात आंब्याचा मोसम म्हटलं की रायवळ आंब्याचं रायतं ठरलेलंच. आता सध्या लॉकडाउनमुळे काही मिळणंच कठीण होऊन बसलंय, पण मनात रायतं खायची खुप ईच्छा होती, मिस्टरांना सांगून ठेवलं होतं बाजारात जाल तेव्हा रायवळ आंबे कुठे दिसले तर घेऊन या. पण मिळत नव्हते ... आणि काल अचानक माझी मैत्रीण धनश्री हीने हे आंबे पाठवून दिले.... मग काय... लागलेच की कामाला... रायतं बनवायला हो... Deepa Gad -
नागपुरी गोळे भात (gole bhaat recipe in marathi)
#KS3 महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे ~ नागपुरी गोळे भात. सुप्रिया घुडे -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
आंबा कढी (amba kadhi recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_कढी आंब्याच्या सिझनमध्ये चटकदार चवीची आंबा कढी एकदा व्हायलाच पाहिजे..शास्त्र असतं ते..सारखं सारखं आंब्याचे गोड पदार्थ खाल्लेल्या जिभेला ही चटकदार चव द्यायची असते..😀 चला रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
शेवग्याची सावजी करी (shevgyachi saoji curry recipe in marathi)
Deepali dake Kulkarni यांची "शेवग्याची सावजी करी" #Cooksnap करत 'महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे :) #KS3 शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे बाजारात शेंगा दिसल्या कि हमखास आमच्याकडे शेगलाची (कोकणातला शब्द :)) भाजी करतात. पहिल्यांदाच विदर्भ पद्धतीने बनवली आहे :) सुप्रिया घुडे -
कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीच जास्त जास्त पदार्थ केलें जातात कैरीचे हे पिठलं भाकरी किंवा भाता सोबत खायला एकदम मस्त . थोडे आंबट पण चवीला छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पडवळाच रायतं (padwlach raita recipe in marathi)
वेली भाजीचा एक प्रकार म्हणजे पडवळ. गौरीच्या प्रसादात आमच्याकडे पडवळ घालून कढि आणि पडवळाची कथली असते. जरा वेगळी पडवळाच रायतं ही रेसिपी ट्राय केली. Deepali dake Kulkarni -
-
सुकी करंदी / सुकट रस्सा (suki karandi recipe in marathi)
... १ - दीड वाटी करंदी आदल्या रात्री साफ करून ठेवली. करंदी साफ करताना डोळे - तोंड - शेपटी काढून टाकायची. डोक्याकडचा भाग तसाच ठेवायचा, त्यातच खरी चव असते. मग ही साफ केलेली करंदी २-३ वेळा पाण्यातून काढायची. रेती कचरा धुवून निघतो. पाणी काढून निथळत ठेवायची.... सुप्रिया घुडे -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे -
दम आलू (Dum Aloo recipe in marathi)
दम आलू हि एक पंजाबी डिश आहे. पंजाबी डिश मध्ये दम आलू मध्ये दह्याचा मुख्यत्त्वे वापर केला जातो. आम्हाला घरात सगळ्यांना कफाचा त्रास असल्याने आम्ही शक्यतो दही खाण्याचे टाळतो. म्ह्णून दम आलू ची पाककृती दह्याचा वापर न करता केलेली आहे. Shital Siddhesh Raut यांची पाककृती मी #cooksnap करत आहे. :) सुप्रिया घुडे -
माँगो कलाकंद बर्फी (Mango Kalakand Barfi Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्याच्या मोसमात आमरसाच्या अनेक रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच रेसीपी माँगो कलाकंद बर्फी मी बनवली कशी विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा#कैरीचे आंबट गोड लोणचंताज्या कैरीचे झटपट होणारे आंबट गोड लोणचे जेवणाचा आस्वाद वाढवणारे Manisha Malvi Angaitkar -
आरोग्यदायी रायतं (raita recipe in marathi)
#cpm2 vegetable rayta- बुंदी,काकडी,पेरू अशा प्रकारे आपण खुप सारी रायतं करतो,पण मी विड्याच्या पानांचा वापर करून औषधी, गुणकारी रायतं केलं आहे. Shital Patil -
रानभाजी - कर्टुली (ranbhaji kartula recipe in marathi)
ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. सुप्रिया घुडे -
कोकणी कांदे आंबट,फरसबी-मटकीची भाजी,तांदळाची भाकरी,तक्कू (matkichi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण म्हणलं की तांदळाचे पदार्थ आलेच कारण कोकणात भाताचं पीक जास्त घेतलं जातं आणि त्यामुळेच कोकणात तांदळाची भाकरी रोजच जेवणात असते.परवा मागे कोकणात रायगड किल्ला पाहायला जाणेसाठी सहलीला जानेचा योग आला होता न तेंव्हाच आम्ही 4-5 दिवस कोकणात राहिलो होतो एक परिचिताच्या घरी आणि तेंव्हा आम्ही कोकणी पाहुणचार अनुभवला व कोकणी पदार्थांची चव चाखली, म्हणूनच आज कोकण विशेष मध्ये तांदळाची भाकरी ,कांदे आंबट, फरसबी-मटकीची भाजी ,तक्कु असा कोकणी पदार्थांचा घाट घातला बघू तर मग पाककृती Pooja Katake Vyas -
आंब्याची कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#amr # उन्हाळा म्हटलं की जेवणात जर आंब्याची कढी असेल तर जेवणाची मजा वेगळीच.सध्या आंब्याचा मोसम आहे त्यामुळे हिरवी कच्ची आंबे मिळतात.जीभेची हौस पण पूर्ण होते. Dilip Bele -
आंबट बटाटा-रस्सा भाजी (Ambat Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
#JLR#लंच_रेसिपीस#आंबट_बटाटा_रस्सा_भाजीनवीन वर्षाच्या सुरुवातीला छान सात्विक जेवण बनवलं. ३१ डिसेंबरला भरपूर प्रमाणात व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी छान सात्विक जेवण बनवलं. वरण भात बासुंदी पुरी श्रीखंड आणि भाजी मधे छान चविष्ट आंबट बटाटा भाजी केली. या आंबटगोड भाजीमुळे जेवणाची रंगत वाढली. भात, चपाती, पुरी कशाबरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. करायलाही अगदी सहज सोपी आणि चविष्ट अन् झटपट तयार होणारी आंबट बटाटा या भाजीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
मॅंगो मिंट सोर्बे (mango mint Sorbe recipe in marathi)
#amrआंब्याचे अनेक प्रकारच्या डेझर्ट्स बनवता येऊ शकतात. आईस्क्रीम,केक्स,पुडिंग, सुफले, शेक्स... यातलाच एक प्रकार म्हणजे सोर्बे. अतिशय पटकन बनणारा पण चवीला तितकाच सुंदर असा आंब्याचा एक डेझर्ट प्रकार... फक्त तीन इन्ग्रेडियंट वापरून हा मिंट फ्लेवर सोर्बे केला आहे. उन्हाळ्यामध्ये पटकन काही थंड खायची इच्छा झाली तर हा पदार्थ आपण सहज करू शकतो. आंबट गोड चवीचे हे डेझर्ट खूप टेस्टी लागते.Pradnya Purandare
-
कुळीथ पिठी (kulith pithi recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि दुसरी पाककृती पोस्ट करत आहे. :)कुळीथ पिठी. सिंधुदुर्गात याला "पिठलं" असं न संबोधता "पिठी" असं संबोधलं जातं. :)कोकणांतली लोकं खाण्याच्या बाबतीत अजिबात बडेजाव न करता जे पेज-भाकरी-पिठी असेल त्यात पोट भरून तृप्त असतात.त्यातलाच एक घराघरात सहज उपलब्ध असलेला, सहज बनणारा पदार्थ म्हणजे - कुळथाची पिठी.कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे.पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते. त्यामुळे हे कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे.कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. सुप्रिया घुडे -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaaji recipe in marathi)
बीट हा लोह, जीवनसत्वं, फॉलीक Acid आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हीमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटि-ऑक्सिडेंट्स (विशेषतः बीटागीयनिन) शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटॅमिन बी १, बी २ आणि व्हिटॅमिन सी हे सर्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. तर अशा या बीट च्या भाजीसाठी मी Rajashri Deodhar यांची रेसिपी #cooksnap करतेय. सुप्रिया घुडे -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)
#trending recipe#aambedalमराठी माणसाच्या घराघरात आंबेडाळ आणि कैरीचे पन्ह हे केलं जातं. महाराष्ट्राची फेमस अशी डाव्या बाजूला म्हणून पानात वाढली जाणारी आंबेडाळ उन्हाळ्यात अगदी हमखास खाल्ली जाते. चैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या समारंभात केला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ. छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थ. नक्की करून पहा. Shital Muranjan -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
मँगो फिरनी (Mango Phirni recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात आइस्क्रीम ,कुल्फी असे अनेक प्रकार आपण ट्राय करत असतो पण मँगो फिरनी हा थोडासा वेगळा आणि अर्थातच वेळखाऊ असला तरी त्यानंतर तयार होणारा लाजवाब डेझर्ट..या मँगो फिरनी ला अप्रतिम टेक्श्चर येण्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे नक्की करून पहा हि अमेझिंग रेसिपी.... Prajakta Vidhate -
ताकाची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi)
गरम गरम भाताबरोबर आंबट- गोड चवीची ताकाची कढी म्हणजे जेवणाची लज्जत न्यारीच !!!ताकाची कढी घरातील सर्व व्यक्तींना आवडते आणि अधून मधून नेहमी केली जाते जेवणाची चव वाढवणारी अशी ही ताकाची कढी. Anushri Pai -
आमरस (Mango Aamras recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात जे सण येतात त्या सणाला गोड-धोड म्हणून आपण जर आमरस केला नाही तर चकितच......अर्थातच हि लेट पोस्ट आहे,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ती मी नैवेद्यासाठी आमरस केला होता.....आमरस आणि पुरी हा फक्कड बेत सर्वांना आवडला. Prajakta Vidhate -
कुळीथाचं रस्सम (kulithach rasam recipe in marathi)
#EB11 #W11आंबट गोड चवीच कुळीथाच रस्सम पौष्टिक आणि immunity वाढविणारे आहे.. नक्की करून पहा Shital Muranjan -
किसलेल्या आंब्याचे लोणचे(रायतं) (ambyache lonche recipe in marathi)
#amr # आंब्याच्या लोणच्याचा वेगळा प्रकार दात पडल्यावर म्हातारपणी फोडी खाणे जमत नाही.जिभेला तर लोणचे पाहिजेच पाहिजे म्हणून त्यांच्या करीता हे लोणचे उत्तमच.चला मग रेसिपी करू या. Dilip Bele -
झिरकं आमटी (zirke amti recipe in marathi)
झिरकं - नाशिक ची खासियत. त्यात शेंगदाणे आणि तिळाचा मुख्यत्वे वापर केला जातो.#KS2 महाराष्ट्राचे किचन स्टार थिम २ : पश्चिम महाराष्ट्र : पहिली पाककृती मी बनवली आहे - झिरकं. सुप्रिया घुडे
More Recipes
टिप्पण्या