"मॅंगो बर्फी" (mango burfi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#amr

"मॅंगो बर्फी"

ही बर्फी बनवण्यासाठी खुप कमी साहित्य लागते व स्वाद तर आ..हा... अतिशय रुचकर, चविष्ट..ही बर्फी बनवुन घरच्यांना खाऊ घातली तर नक्कीच सगळे खुश... चला पटकन रेसिपी बघुया..

"मॅंगो बर्फी" (mango burfi recipe in marathi)

#amr

"मॅंगो बर्फी"

ही बर्फी बनवण्यासाठी खुप कमी साहित्य लागते व स्वाद तर आ..हा... अतिशय रुचकर, चविष्ट..ही बर्फी बनवुन घरच्यांना खाऊ घातली तर नक्कीच सगळे खुश... चला पटकन रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
पाच सहा
  1. 1 कपआंब्याचा गर
  2. 3/4 कपसाखर
  3. 1/2 कपमिल्क पावडर
  4. आवडीनुसार पिस्त्याचे काप
  5. आवडीनुसार वेलचीपूड

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    आंबे कापून मिक्सरमध्ये फिरवून गर काढून घ्या.

  2. 2

    मिडीयम गॅसवर कढईत आंब्याचा गर घाला, साखर घालून मिक्स करा आणि हलवत रहा..

  3. 3

    दहा मिनिटात मिश्रण घट्टसर होईल मग गॅस बारीक करुन तीन टेबलस्पून मिल्क पावडर शिल्लक ठेवा आणि उरलेली सगळी मिश्रणात घाला.

  4. 4

    चांगले मिक्स करा व सतत हलवत रहा.गॅस बारीक च असावा नाहीतर मिश्रण तळाशी चिकटेल.

  5. 5

    दहा मिनिटात मिश्रण घट्टसर होईल मग गॅस बंद करा आणि शिल्लक ठेवलेली मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करा.पाच मिनिटे घोटून घ्या म्हणजे मऊसुत मिश्रण होईल व बर्फीला छान टेक्श्चर येईल.

  6. 6

    मिश्रण मधे मधे हलवत रहा व दुसरीकडे बर्फी ट्रेमध्ये बटर पेपर घालून घ्या तुप लावा व थोडे पिस्त्याचे काप पसरवून घ्या व त्यावर बर्फीचे मिश्रण ओतुन पसरवून घ्या..वर पिस्त्याचे काप लावा.

  7. 7

    दहा मिनिटांनी बर्फी थोडी सेट होईल लगेच कापून घ्या आणि तशीच झाकून पुर्ण सेट होण्यासाठी ठेवा.. फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही..रुमटेंपरेचर मध्येच सेट होऊ द्या.

  8. 8

    एक तासानंतर ट्रे मधुन बटर पेपर अलगद उचलून घ्या व बर्फी एका ताटात पलटी करून बटर पेपर काढून घ्या.किंवा परत बटर पेपरवर ठेवून बर्फी वडी वेगवेगळ्या करा.मी दोन्ही बाजूंनी पिस्त्याचे काप लावले आहेत, त्यामुळे खुप सुंदर दिसत आहे.

  9. 9

    सर्व्हिंग प्लेटमध्ये बर्फी काढून सजावट करुन फोटो काढा आणि सर्व्ह करण्याची गरजच नाही घरातले सगळे पटापट बर्फी उचलून घेतील चव घेऊन तुम्हाला शाबासकी नक्कीच देतील...

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes