मँगो चीज केक (mango cheese cake recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#amr
आंब्याच्या सिझनमध्ये मी एकदातरी ही रेसिपी हमखास करते. माझ्या घरी मँगो चीज केक हा सर्वांना आवडतो..बर्याच वेळा असे वाटते की चीज केक फक्त रेस्टॉरंटमध्येच मिळतो पण घरी सुद्धा ही रेसिपी आपण बनवू शकतो..साध्या व सोप्या ३-४ पायर्यामध्येच हा केक बनवून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि बच्चे कंपनीला खुश करा....

मँगो चीज केक (mango cheese cake recipe in marathi)

#amr
आंब्याच्या सिझनमध्ये मी एकदातरी ही रेसिपी हमखास करते. माझ्या घरी मँगो चीज केक हा सर्वांना आवडतो..बर्याच वेळा असे वाटते की चीज केक फक्त रेस्टॉरंटमध्येच मिळतो पण घरी सुद्धा ही रेसिपी आपण बनवू शकतो..साध्या व सोप्या ३-४ पायर्यामध्येच हा केक बनवून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि बच्चे कंपनीला खुश करा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ४०० ग्रॅम मिल्कमेड
  2. २०० ग्रॅम पनीर
  3. २०० मि.ली फ्रेशक्रीम
  4. 2 चमचेजिलेटीन
  5. 2-3हापूस आंबे
  6. 1 चमचामँगो इसेन्स
  7. 2छोटे पॅक मारी बिस्कीटस्

कुकिंग सूचना

  1. 1

    मारीचे बिस्कीटस् मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.

  2. 2

    बारीक केलेल्या बिस्कीटांमध्ये मेल्ट करून घेतलेले बटर हाताने मिक्स करून घ्यावे. २ चमचे जिलेटीन एका काचेच्या भांड्यात थोड्याश्या पाण्यात मिक्स करावे आणि डबल बाॅईलिंग पद्धतीने गॅसवरती मोठ्या भांड्यात पाणी गरम करून जिलेटीन मिक्स केलेले भांडे ठेवावे व ५ मिनीटे हलवत रहावे. ग्रिटरमध्ये पनीरचे तुकडे टाकून बारीक करावे.

  3. 3

    पुढील प्रोसेस करण्याआधी बटर लावून ठेवलेला बिस्किटांचा चुरा केकच्या मोल्डमध्ये हाताने प्रेस करून बसवावा व फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावा. मी ईथे सिलिकॉनचा मोल्ड वापरला आहे त्यामुळे केक सहजरित्या सूटा करून घेता येतो. बारीक केलेल्या पनीरमध्ये मिल्कमेड आणि आंब्याचे तुकडे घालून मिक्स करून घ्यावे..

  4. 4

    फ्रेश क्रिम ब्लेंडरने फेटून घ्यावे. आता फ्रेश क्रिम आणि वर केलेले मिश्रण एकत्र करून घ्यावे, त्यातच एक चमचा मँगो इसेन्स आणि जिलेटीन छान मिक्स करून घ्यावे, जिलेटीन मुळे केक सेट होण्यासाठी मदत होते.

  5. 5

    मोल्डमध्ये बिस्किटांच्या चुर्याच्या वरून हे मिश्रण टाकावे आणि सेट होण्यासाठी ४-५ तास फ्रिजमध्ये ठेवावे. मी ईथे ग्लासमध्ये पण लेयर्स लावले आहेत. आधी बिस्किटांचा चुरा त्यावरून मिल्कमेड, पनीरचे व मँगोचे मिश्रण आणि त्यावर फ्रेशक्रीमचा लेयर लावला आहे.

  6. 6

    ४-५ तास फ्रिजमध्ये ठेऊन सेट झाल्यावर हलक्या हाताने मोल्डमधून काढून घ्यावा आणि सर्व्ह करावा हा छानसा मँगो चीज केक.....

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

Similar Recipes