मँगो पॅनकेक टॉप विथ चॉकलेट सॉस(Mango Pancake with chocolate sauce recipe in marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#amr

आणखी एका झटपट होणारा आणि मुलांना आवडणारा प्रकार... त्या मॅंगो फ्लेवर ॲड केल्यावर याला आणखीनच मजा येते आणि चॉकलेट हे तर मुलांचे एनी टाइम फेवरेट त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे भन्नाट पॅनकेक सर्वांना आवडतात.

मँगो पॅनकेक टॉप विथ चॉकलेट सॉस(Mango Pancake with chocolate sauce recipe in marathi)

#amr

आणखी एका झटपट होणारा आणि मुलांना आवडणारा प्रकार... त्या मॅंगो फ्लेवर ॲड केल्यावर याला आणखीनच मजा येते आणि चॉकलेट हे तर मुलांचे एनी टाइम फेवरेट त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे भन्नाट पॅनकेक सर्वांना आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅममैदा
  2. 2 वाट्यासाखर
  3. 1 चमचाबेकिंग पावडर
  4. 1 आंब्याची मँगो प्युरी
  5. 4मोठे चमचे बटर
  6. सजावटी करीता मध
  7. आवश्यकतेनुसार दूध
  8. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मैदा चाळून घेऊन तो एका पातेल्यात घ्यावा त्या नंतर त्यात पिठीसाखर घालावी, बेकिंग पावडर घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे त्यानंतर मेल्टेड बटर घालावे.

  2. 2

    आता या मिश्रणात दूध घालावे, दूध हळूहळू घालावे आणि त्याच वेळेस हे मिश्रण एकत्रित करत राहावे गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी,आता आंब्याची प्युरी ग्राइंडर मधून तयार करून घ्यावी.

  3. 3

    ही तयार मॅंगो प्युरी या मिश्रणात घालावी, व्यवस्थित एकत्रित करावी आता गॅसवर तवा तापायला ठेवावा,व्यवस्थित तापला की त्यात पळीने छोटे पॅन केक घालावे, दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे त्याला रंगही छान येतो आणि चवीलाही खूप छान लागतात.

  4. 4

    सर्व्ह करताना वरून चॉकलेट सॉस स्प्रेड करावा आणि मध् हि टाकावे त्यानंतर बनाना आणि आंब्याचे छोटे तुकडे घालून सजावट करावी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes