टँगी लेमनी एगलेस पॅनकेक (lemon eggless pancake recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#पॅनकेक

पॅनकेक ला गोडासोबत जरासा टँगी फ्लेवर आला तर त्याची लज्जत आणखीनच वाढेल. तर मी या पॅनकेक्स ना टँगी फ्लेवर देऊन त्यात लिंबू पण टाकले आहे त्यामुळे टँगी फ्लेवर बरोबर लिंबाचा सुगंध देखील खाताना आपल्याला येणार आहे. पॅनकेक ने पोट पण भरेल आणि लिंबा मुळे आपल्याला प्रसन्न देखील वाटेल.. मी पॅनकेक सोबत लिंबाचे फिलिंग पण घरीच तयार केले आहे. चला तर मग आस्वाद घेऊया या अनोख्या टँगी लेमनी पॅनकेक चा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
6 जणांसाठी
  1. पॅनकेक तयार करण्यासाठी
  2. १०० ग्रॅम मैदा
  3. ५० ग्रॅम पिठी साखर
  4. 4 टेबल स्पूनअमूल बटर
  5. 1/2 टी स्पूनबेकिंग सोडा
  6. 1/4 टेबल स्पूनमीठ
  7. आवश्यकतेनुसार दूध
  8. टँगी फ्लेवर बनविण्यासाठी लेमन फिलिंग
  9. १५० मिली पाणी
  10. 1लिंबू
  11. 2 टेबल स्पूनलिंबाचा रस
  12. 5 टेबल स्पूनसाखर
  13. 1 टेबल स्पूनकॉर्न फ्लोअर
  14. 1/2 टी स्पूनपिवळा फूड कलर किंवा हळद
  15. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम टँगी फ्लेवर बनविण्यासाठी लेमन फिलिंग करून घ्यावे. व ते १५ ते २० मिनिटे गार करण्यासाठी ठेवावे. तर त्यासाठी एका बाऊल मध्ये पाणी घेऊन त्यात साखर, कॉर्न फ्लोअर, लिंबाचा रस, पिवळा कलर मी इथे हळद घातली आहे हे सर्व साहित्य घालावे

  2. 2

    त्यावर एक लिंबाचं साल थोडे किसून घालावे त्याने लेमनी फ्लेवर येतो.

  3. 3

    आता हे सर्व मिश्रण मिक्स करून गॅस वर घट्ट होण्यासाठी ठेवावे. थोड्यावेळाने त्याला उकळी आली की गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे. थोडे थंड झाले की हे मिश्रण घट्ट बनते.

  4. 4

    पॅनकेक बनविण्यासाठी एका बाऊल मध्ये मैदा, पिठीसाखर,अमूल बटर, बेकिंग सोडा व वरून थोडे मीठ टाकावे या मिश्रणात थोडे थोडे दूध घालून त्याचे पातळ बॅटर करावे.

  5. 5

    एका तव्यावर साजूक तूप घालून त्यावर हे छोटे छोटे पॅनकेक करून घ्यावेत. पॅनकेक ला मस्त जाळी सुटली की ते पलटून घ्यावेत. व दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घ्यावे. अशाप्रकारे आपले जाळीदार पॅनकेक तयार होतात.

  6. 6

    आता हे टँगी लेमनी पॅनकेक अरेंज करण्यासाठी ते एकावर एक ठेवावे. दोन पॅनकेक मध्ये थोडे थोडे लेमन चे फिलिंग भरावे. अशाप्रकारे सर्व पॅनकेक रचून घ्यावे व शेवटी त्यावरून तयार केलेले लेमन फिलिंग वरतून ओतून घ्यावे. आता हे पॅनकेक बेदाणे घालून सर्वांना सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

Similar Recipes