एगलेस मँगो पॅनकेक (eggless mango pancake recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

एगलेस मँगो पॅनकेक (eggless mango pancake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण अर्धा तास
  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपमँगो क्रश
  3. 1/2 कपदूध....अंदाजे
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. 1-2 टेबलस्पूनबटर
  7. 1 टेबलस्पूनपिठीसाखर....आवडीनुसार जास्त घालावी
  8. आंब्याच्या फोडी आणि मंगोंक्रश सर्व्ह करताना....आवडीनुसार

कुकिंग सूचना

साधारण अर्धा तास
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    मैदा,पिठीसाखर,मँगो क्रश,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा हे सर्व एकत्र मिक्स केले.

  3. 3

    नंतर त्यात आवश्यकतेनुसार दूध घालून छान मिक्स करून घेतले.

  4. 4

    पॅनला बटर लावून त्यावर पळीच्या साहाय्याने बॅटर घालून पॅनकेक घातले.

  5. 5

    तीन चार मिनिटात पॅन केक वर बुडबुडे यायला लागले की हळूच पॅनकेक उलटुन दुसऱ्या बाजूनेही दोन तीन मिनिटे छान खरपूस होऊ दिला.मग काढून घेतला.

  6. 6

    एवढ्या बॅटर मध्ये मध्यम आकाराचे चार ते पाच पॅन केक तयार होतात. आपण जेवढ्या आकाराचे करू तसे.

  7. 7

    तयार पॅन केक वर आंब्याच्या फोडी आणि मँगो पल्प किंवा क्रश जे आवडतं असेल ते घालून सजवले व सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes