खान्देशी फुनके किंवा वाफोले (khandeshi phunke recipe in marathi)

#KS4 # खानदेशी_रेसिपीज
#खान्देशी_फुनके किंवा वाफोले..
खान्देश म्हटले की आठवतात बहिणाबाई "आधी हाताले चटके तवा मियते भाकर".. आपल्या कवितेतून साध्या साध्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणातून जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी थोर कवयित्री ही खानदेश ची ओळख आहे..
खान्देश म्हणजे महाराष्ट्रातील जळगांव, नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे असलेला प्रदेश. हा प्रदेश दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला...खान्देशात शेतीव्यवसाय हा मूळ व्यवसाय...तूर,केळी,कापूस,शेंगदाणे, हिरवी भरताची वांगी,वेगवेगळ्या डाळी ही इथल्या हवामानाला अनुसरुन पिकणारी पिके..त्यामुळे साहजिकच खाद्यसंस्कृती मध्ये मोलाचा वाटा..जे मुबलक पिकतं तेच खाल्लं जातं.. तूरडाळ,मूगडाळ वापरुन तेथील होळी स्पेशल रेसिपी म्हणजे फुनके,फुणके,मुटके,मुटकुळे,भेंडके,वाफोले....एकाच पदार्थाची अनेक नांव..अतिशय चविष्ट.. हो असणारच..कारण इथली खाद्यसंस्कृती मुळातच तिखट,चमचमीत,मसालेदार,तर्रीदार..महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा अंमळ तिखटच...तर असे हे होळी स्पेशल फुनके शाळेत असताना मैत्रिणीच्या घरी खाल्ले होते..😋😋त्यानंतर आज करायचा योग आला..कढीबरोबर फुनके खाणं किंवा नुसतेच कुस्करुन वरुन कांदा,फोडणी,कोथिंबीर घालून खाणं हा निव्वळ खाद्यानंदच आहे..चला तल मग हा खाद्यानंद कसा निर्माण करायचा हे तुम्हांला सांगते...
खान्देशी फुनके किंवा वाफोले (khandeshi phunke recipe in marathi)
#KS4 # खानदेशी_रेसिपीज
#खान्देशी_फुनके किंवा वाफोले..
खान्देश म्हटले की आठवतात बहिणाबाई "आधी हाताले चटके तवा मियते भाकर".. आपल्या कवितेतून साध्या साध्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणातून जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी थोर कवयित्री ही खानदेश ची ओळख आहे..
खान्देश म्हणजे महाराष्ट्रातील जळगांव, नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे असलेला प्रदेश. हा प्रदेश दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला...खान्देशात शेतीव्यवसाय हा मूळ व्यवसाय...तूर,केळी,कापूस,शेंगदाणे, हिरवी भरताची वांगी,वेगवेगळ्या डाळी ही इथल्या हवामानाला अनुसरुन पिकणारी पिके..त्यामुळे साहजिकच खाद्यसंस्कृती मध्ये मोलाचा वाटा..जे मुबलक पिकतं तेच खाल्लं जातं.. तूरडाळ,मूगडाळ वापरुन तेथील होळी स्पेशल रेसिपी म्हणजे फुनके,फुणके,मुटके,मुटकुळे,भेंडके,वाफोले....एकाच पदार्थाची अनेक नांव..अतिशय चविष्ट.. हो असणारच..कारण इथली खाद्यसंस्कृती मुळातच तिखट,चमचमीत,मसालेदार,तर्रीदार..महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा अंमळ तिखटच...तर असे हे होळी स्पेशल फुनके शाळेत असताना मैत्रिणीच्या घरी खाल्ले होते..😋😋त्यानंतर आज करायचा योग आला..कढीबरोबर फुनके खाणं किंवा नुसतेच कुस्करुन वरुन कांदा,फोडणी,कोथिंबीर घालून खाणं हा निव्वळ खाद्यानंदच आहे..चला तल मग हा खाद्यानंद कसा निर्माण करायचा हे तुम्हांला सांगते...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीची डाळ 5-6 तास भिजत घालावी.त्यानंतर ती निथळून घ्या,मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून त्यात हिरवी मिरची जीरे आणि लसूण पाकळ्या टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी.
- 2
आता बारीक केलेली डाळ एका वाडग्यात काढून घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद,धणेपूड,तीळ,कांदा,कोथिंबीर ओवा घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.आता आपल्याला ज्यात फुनके वाफवयाचे आहे, त्या चाळणीला थोडेसे तेल लावून घ्यावे..आणि पातेल्यात पाणी घालून ते गरम करा..
- 3
तयार मिश्रणाचे मुठीच्या आकाराचे फुनके करून ते चाळणीवर ठेवा आणि ही चाळणी पातेल्यावर ठेवा..चाळणीवर झाकण ठेवून 15 मिनीटे मध्यम आचेवर फुनके वाफवून घ्या.
- 4
नंतर गँस बंद करुन फुनके गार करुन घ्या..तयार झाले आपले चविष्ट फुनके तयार..हे फुनके एका डिशमध्ये ठेवून कढी बरोबर सर्व्ह करा..किंवा नुसतेच खायला पण मस्त लागतात..
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फुनके (phunke recipe in marathi)
#KS3 #फुनके# हा प्रकार खेड्यामध्ये केल्या जातो. माझ्या आईकडे नवरात्रात अष्टमीच्या पूजेच्या दिवशी करतात ..आणि त्याचा नैवेद्य देवीला असतो. हे फूनके करताना ते गोल किंवा मुठीच्या आकाराचे करतात. वाफवून झाल्यानंतर ते नुसतेच खातात किंवा बारीक करून त्याला तडका देतात किंवा फोडणी देऊन करतात.. असेही खाल्ले तरी ते छानच लागतात... Varsha Ingole Bele -
खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)
#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात. Vaishali Dipak Patil -
खान्देशी पारंपारिक चवळीचे फुनके /भेंडके (chavliche fhunke recipe in marathi)
#KS4#खान्देशखानदेशातील प्रसिद्ध असलेली चिवळीची भाजी..चवीला आंबूस चिकटसर आणि तितकीच पौष्टिकतेने परिपूर्ण असलेली चिवळीची भाजी....या भाजीपासून खानदेशात विशेषतः होळीच्या सणाला चिवळभाजी फुनके बनविले जातात... व हे फुनके कढी सोबत नि चिंचचेच्या पन्ह्या सोबत सर्व्ह केले जातात..... फुनके हे वेगवेगळ्या डाळी पासून केले जातात. प्रामुख्याने तूरडाळ फुनके करण्यासाठी वापरली जाते. पण तूर, चना, मुंग, चवळी एकत्र करूनही फूनके केले जातात. डाएट करणार्यांसाठी लो-कॅलरी डिश व पोटभरीचा आगळावेगळा प्रकार.. म्हणजेच *खान्देशी पारंपारिक चिवळीचे फुनके /भेंडके*... 💃 💕 Vasudha Gudhe -
खान्देशी दाणे लावून गवारीची भाजी (dane laun gavarachi bhaji recipe in marathi)
#ks4जळगाव, धुळे, अमळनेर, नंदुरबार हा सगळा भाग म्हणजे खानदेश. इथली खाद्यसंस्कृती इतकी मस्त झणझणीत आहे की बस्स!ताज्या हिरव्या मिरच्या वापरून खरं तर हा पातळ भाजीचा किंवा आमटीचा प्रकार आहे. अतिशय झणझणीत पण अतिशय चवदारही......एकदा खाल्लात की परत परत खाल.खान्देशी दाणे लावून गवारीची भाजीअस्सल खान्देशी गवार, चला तर मग बघूया कशी बनवायची...... Vandana Shelar -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी खिचडी Rupali Atre - deshpande -
कढी फुनके (Kadhi Phunke Recipe in Marathi)
#KS4खानदेश म्हणजे तीन जिल्हे. धुळे, जळगाव व नंदुरबार. इथली भाषा अहिराणी. इथल्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे. इथल्या मातीत बरीच मातब्बर मंडळी होऊन गेली आणि आजही आहेत. इथल्या जेवणाची चव जशी वेगळी आहे, तशीच इथल्या साहित्याची धार हीसुद्धा निराळीच. बहिणाबाई चौधरी यांचं काव्य, त्यांच्या ओव्या तर सगळ्यांना सुपरिचित आहेतच. इथल्या भाषेत जरी गोडवा असला तरी इथले पदार्थ मात्र तिखट असतात. खान्देशी भरीत भाकरी तर जगात प्रसिद्ध आहेच. पण घराघरातून तयार होणारे रोजच्या जेवणातले पदार्थही विशेष आहेत. साधे सोपे तरीही चविष्ट. त्यातलाच हा पदार्थ कढी फुनके. तुरीच्या डाळीचे हे वाफवलेले फुनके हलके आणि कढीबरोबर तर मस्तच. थोडक्यात म्हणजे whole meal च😊😋 Anjali Muley Panse -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी सुप्रिया घुडे -
अस्सल खान्देशी वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी (vangyach bharit ani bhakhri recipe in marathi)
#KS4दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्टय़ांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश.खान्देशी ठसकेबाज ,श्रमिक दिनचर्या, त्यालाच अनुरूप झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण...😋😋खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे.खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी यालाच खान्देशात कळणा असे म्हणतात. ज्वारी आणि अख्खे काळे उडीद मिक्स करून दळून आणून याची भाकरी बनवली जाते.खान्देशी वांग्याचे भरीत मी अनेकदा बनवलं..पण कळण्याची भाकरी पहिल्यांदाच बनवून पाहिली .. वांग्याच्या भरीतासोबत ही भाकरी खूपच चवदार लागते.चल तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi)
#KS4 #WEEK4 #RECIPE1दख्खन पठाराच्या कोनाड्यात वसलेलं.... तापी नदीच्या खोऱ्यातलं.... टुमदार असं *खानदेश प्रांत*.... उत्तरेला सातपुडा पर्वत रांगांनी..., पूर्वेला वऱ्हाड प्रांताने...., पश्चिमेला वेस्टर्न घाटाने...., आणि दक्षिणेला अजंठा लेण्यांनी वेढलेलं हे खानदेश....सामावलयं,.... महाराष्ट्रातील सध्याच्या... धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधे...!!महाराष्ट्राचे *सर्वाधिक तिखट Cuisine* अशी ओळख घेऊन मिरवणारा हा प्रांत...,नानाविध खानपान कलेंच्या चविष्ट मिलाफाचा देश म्हणून.... *खानदेश* (अशी आपली माझ्यातल्या खवय्येगिरीने मांडलेली संकल्पना...!!!😊😋)"तिखटाची चव... तेलाची वाही झणझणीत तर्री ....माझ्या वेज खवय्ये दोस्तांनो.... तुमच्यासाठी...आजची *डुबुक-वडे* मेजवानी लयचं भारी...."😋😊🥰😋😊🥰😋©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशी पदार्थ बरेचसे झणझणीत, मसालेदार, आहेत. तसेच बऱ्याच पदार्थाना थोडी पूर्वतयारी करावी लागते, म्हणजेच कांदा खोबरे भाजणे, वाटण बनवणे पण म्हणूनच ते पदार्थ तितके चवदार लागतात. पण खान्देशी खिचडीला फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही आणि तरीही ती तितकीच चवीष्ट लागते. रात्रीच्या जेवणाला किंवा अगदी आजच्या लाईफस्टाईल प्रमाणे ब्रंच (ब्रेकफास्ट+ लंच) करायचा असेल तर ही खिचडी हा उत्तम पर्याय आहे.खान्देशी खिचडी मध्ये फारशा भाज्या वापरल्या जात नाहीत.या खिचडीचे वेगपण हे की यामध्ये तूरडाळीचा वापर केला जातो.चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
चिवई/चिवळा च्या भाजीचे फुनके किंवा मुटके(Chivai Bhaji Che Funke Recipe In Marathi)
#RDRचिवळी च्या भाजीचे डाळ टाकून केलेले मुटके हे कढी बरोबर खाल्ले जातात अतिशय टेस्टी व हेल्दी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
अख्ख्या गवार भाजी सावजी स्टाईल (gavar bhaji recipe in marathi)
#Trending_recipe ....... ....... 😋👉नागपूर सावजी स्पेशल चमचमीत तर्रीदार... 𝙂𝙖𝙫𝙖𝙧 𝙗𝙝𝙖𝙟𝙞अख्खा गवार....सावजी स्टाईल👍👍😋😋😋विदर्भ म्हंटलं की ब-याचशा झक्कास भाज्यांचे नांवे पुढे येतात आणि त्यातल्याच खूप प्रसिद्ध असलेल्या सावजी भाज्या मग त्या व्हेज असाे की नाॅनव्हेज सगळ्या कशा एका पेक्षा एक सरस आणि झणझणीत. आज मी घरी सावजी पद्धतीची चमचमीत #अख्खागवार भाजी बनवलेली आहे ,जी नागपूरला खासकरून सावजींच्या लग्नप्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात, स्पेशली माझ्या घरी गणपतीच्या जेवणात बनवलेली जाते, अख्ख्या गवार भाजी ही 😋खूप चमचमीत तर्रीदार तर असतेच पण चवीला अप्रतिम असते. 😋😋😋....#Jyotshnaskitchan🤗👉 Jyotshna Vishal Khadatkar -
खान्देशी भरीत (khandeshi bharit recipe in marathi)
#GA4 #week9गोल्डन एप्रंन मधील क्रॉसवर्ड पझल मधील की वर्ड एग प्लांट ओळखून मी एग प्लांट म्हणजे वांगे चे खान्देशी भरीत केले आहे.माझे आजोळ खान्देश असल्याने तिथल्या वांग्याची चव मधून मधून चाखायला मिळते . मामा कडले कुणी आले की हमखास वांगी आणतात. ते आज ही मिळाले भरीत बनवण्याचा मोह आवरता आला नाही .तसेच की वर्ड पण एग प्लांट होता. Rohini Deshkar -
भरलेली खान्देशी मिरची (bharleli khandesi mirchi recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल Mrs. Snehal Rohidas Rawool -
चमचमीत नकली वांगे (nakli vangi recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल झणझणीत भाजी Manisha Shete - Vispute -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#KS4#खान्देशहा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.खानदेशात मुख्यत्वे अहिराणी आणि तावडी या प्रमुख बोली आहेतवांग्याचे भरीत हे खान्देशात प्रसिद्ध आहे Sapna Sawaji -
खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
#KS4 #खान्देशी_रेसिपीज #खान्देशी _उडीद_वडे... खानदेशामध्ये भौगोलिक परिस्थितीला अनुसरून डाळींचे पिक हे जास्त प्रमाणावर येते किंवा घेतले जाते या डाळींपैकीच एक महत्त्वाची डाळ म्हणजे उडीद डाळ किंवा काळे उडीद ..याचं भरपूर प्रमाणावर खानदेशामध्ये पीक घेतलं जातं.. साहाजिकच या प्रोटीन पावर पॅक उडदाच्या डाळीचे वेगवेगळे पदार्थ आहारात समाविष्ट केले जातात.. आपल्याला उडदाच्या डाळीचा मेदू वडा फक्त माहित आहे जो साउथ ला बनवला जातो परंतु खानदेशामध्ये देखील या उडदाच्या डाळीपासून बडीशेप जीरे वाटून घातलेले उडदाच्या डाळीचे चमचमीत वडे हा देखील एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे .चला तर मग खानदेशातील फार जुना म्हणजे 1000 ते चौदाशे वर्षांपूर्वीचा अस्तित्वात आलेला लेवा पाटील या क्षत्रिय, मेहनती ,कामसूपणामुळे श्रीमंत बनलेल्या समाजाने उडदाच्या डाळीचा उपयोग करून खानदेशी उडीद वडे तयार केलेत... ते कसे केलेत ते आता आपण पाहू या Bhagyashree Lele -
खान्देशी भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देशात भरलेली मिरची फार प्रसिद्ध आहे खानदेशात नंदुरबार भागांना मिरचीचे उत्पादन होते तिथली ही मोठी मिरची प्रसिद्ध आहेखिचडी सोबत तोंडी लावायला किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतात चवीला पण छान लागते Sapna Sawaji -
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande -
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)
#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा... Varsha Ingole Bele -
खान्देशी वांग्याचे भरीत.. (khandeshi wangyache bharit recipe in marathi)
...खान्देशी वांग्याचे भरीत...#GA4#week9#eggplant#cooksnap#AmitChaudhariहिवाळा सुरू झालाय, मस्त थंडी पडायला लागली आहे. आणि अशा थंडीमध्ये वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, गरमागरम भाकर खावशी वाटणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला आढळणार नाही... त्याला अपवाद मीदेखील कशी असणार बरं..?म्हणून मग मीही भरीत करण्याचा बेत ठरविला. पण नागपूरच्या पद्धतीने न करता, खान्देशी पद्धतीनेAmit Chaudhari सरांच्या रेसिपी वरून, करून बघितले. अमित सरांनीची पद्धत वापरून केलेले हे भरीत, चवीला खुपच भन्नाट आणि एक नंबर झालेले आहे.तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा *खान्देशी वांग्याचे भरीत*... 💃 💕 Vasudha Gudhe -
वांग्याचे भरीत (खान्देशी) (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#cooksnapमहाराष्ट्रातील खान्देश म्हटला की खवय्यांना आठवते ते तेथील वांगी आणि प्रसिद्ध वांग्याचे भरीत. खान्देशी वांग्याचे भरीत करण्यासाठी खास हिरवी वांगी वापरली जातात, जी जळगावात मोठ्या प्रमाणात मिळतात. आता शहरातही मिळू लागली आहेत. Kalpana D.Chavan -
खान्देशी कढी (khandeshi kadhi recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #खान्देशी कढी... कढी हा साधारणपणे भारतात सगळ्या राज्यांमध्ये हे होणारा एक आवडीचा पदार्थ.... खूप सारे व्हेरिएशन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.कढी म्हणजे किती प्रकार होतात ना आपली नेहेमीची आले-लसूण-मिरची वाटून लावलेली कधीतरी खोबरे घातलेली. पंजाबी कढी म्हणजे मस्तपैकी पकोडे तळून घातलेली. गुजराती कढी म्हणजे थोडी गोडसर आणि लसूण वगैरे न घालता दालचिनी, लवंगा घालून केलेली. तामिळनाडूमधे केलेली कढी म्हणजे तूरडाळ-तांदूळ-धने वाटून लावून केलेली. कर्नाटकातली कढी साधारण महाराष्ट्रातल्या सारखीच पण कधी पडवळ तर कधी भेंडी घालून केलेली!..यात आता अजून एक कढीचा प्रकार म्हणजे खानदेशी कढी. आता खानदेश आहे महाराष्ट्रात.. पण त्यांची कढी करायची पद्धत आहे थोडीशी वेगळी. लसूण-मिरची-आले एकत्र करून तो गोळा घट्ट तुपात मिसळतात. हा तूप-मसाल्याचा गोळा तयार होता तो, थोडे दगडफूल आणि कढीपत्ता असे सगळे एका वाटीत घेतात. लहान कोळश्याचा तुकडा लाल होईपर्यंत फुलवतात. आणि लाल फुललेल्या कोळश्याच्या निखाऱ्यावर तूप-मसाल्याचे मिश्रण घालून त्याची फोडणी करतात. आणि हे सगळे केले जाते मातीच्या मडक्यात!!! कोळसा, मडके, दगडफूल या सगळ्याची एकत्र चव जी काय लागते ती एकदम कमाल असते.पण आपण ही कढी गँसवरच आणि पातेल्यात करु या.. Bhagyashree Lele -
डाळ गंडोरी (Dal Gandori Recipe in Marathi)
#KS4खान्देशची मातीत केळीचा गोडवा जरूर आहे पण ह्या संस्कृतीले पदार्थ मात्र झणझणीत पण चविष्ट 😊😋 केळाचा गोडवा इथल्या माणसाच्या स्वभावात ऊतरलाय बहुतेक. माझी काकूचे माहेर जळगाव त्यामुळे शेवभाजी, भरीत भाकरी, केळाचा सुधारस हे पदार्थ अगदी लहानपणापासून चाखलेले. पण लग्नानंतर आमच्या महाजन काकुंनी माझी ही खान्देशी खाद्यसंस्कृती अजुन समृद्ध केली. त्याच्याकडूनच शिकलेली ही डाळ गंडोरी. नाव जस वेगळच तशीच ह्याची चवही. मी आतापर्यंत विविध प्रकारच्या डाळी बनवल्या पण दाल बनवतांना शेंगादाणे ह्याच डाळीत वापरले. चला बघूया कशी बनवायची डाळ गंडोरी. Anjali Muley Panse -
कुलदेवीचा नैवेद्य (naivedya recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यआज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरी देवीला खण केल्या जातो.खण म्हणजेच देवी साठी केलेला नेवेद्य.या नैवेद्यात कणकेचे नऊ दिवे, नऊ छोट्या पुरणाच्या पोळ्या आणि नऊ वडे ठेवले जातात.हे ताट तयार झाल्यावर खूप सुंदर दिसतं.दिवे साध्या कणकेचे असल्यामुळे त्याला तुपात शिजवले जाते.पुरणपोळी मोहाच्या फुलांनी तयार केलेले पुरण यांनी केली जाते.तसेच वडे लाखोळी च्या डाळीचे बनवले जाते.आमची कुलदेवी म्हणजे भवानी माता.भवानी मातेचे सोबतच हा नैवेद्य घराच्या अंगणातही नैवेद्य दाखवला जातो.घराच्या अंगणातल्या देवीला अंगण बाई असे म्हटले जाते.अशीच ही माझी कुलदेवी आणि अंगण बाई या दोघी देवीसमोर मी प्रार्थना करते की माझं आयुष्य माझा संसार आणि माझं घर अंगण सदा सुखी राहू दे.चला तर बनवूया गुरुपौर्णिमा स्पेशल कुलदेवी चा नैवेद्य. Ankita Khangar -
खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#KS4 #खान्देशी रेसिपीज #खान्देशी_शेव_भाजी हा पाहुणचारातील महत्वाचा पदार्थ मानला जातो..आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात अनेक वेगवेगळ्या पाककृती आहेत त्यावरून आपली खाद्यसंस्कृती किती अफाट आहे ते कळते. प्रत्येक प्रांतात बऱ्याच पाककृतींमध्ये साम्य आहे. पण तरीही त्या-त्या प्रांताची एक वेगळी खासियत त्या पाककृतीत आहे. म्हणूनच तिचा वेगळेपणा जाणवतो.अशीच महाराष्ट्रातल्या खान्देश प्रांतातली एक खास रेसिपी आहे ती म्हणजे खानदेशी शेवेची भाजी.झणझणीत स्वादामुळे शेवभाजी अनेक खवय्यांचा वीक पॉईंट बनली आहे.घाई गडबड आहे अन् स्वादिष्टपण हवंय..अशादोन ध्रुवाची सांगड घालायची असेल तर शेवभाजी हा चांगला पर्याय सुचविला जातो. खान्देशच्या खाद्य संस्कृतीतील चमचमीत अन् झणझणीतपणाचे वैशिष्ट शेवभाजीच्या ठायी पुरेपूर उतरले आहे. महामार्गांवरील ढाब्यांमध्ये गरमा गरम शेवभाजी मेन्यूकार्डवर असतेच असते.. यातील आणखी एक वैशिष्ट म्हणजे शेवभाजी हा मेन्यू एकच असला तरीही हॉटेल किंवा ढाबा बदलावा तशी या भाजीची चवही बदलते. यात राजस्थानी शेवभाजी पण येते...्काही ठिकाणी शेवभाजीसाठी खास बनविली जाणारी तुरवारी शेव वापरली जाते. अगोदरच तिखट शेवेची झणझीत भाजी अन् त्यात लालबुंद मिरची असा तिखट योग जुळून आला तर नाकातून ,डोळ्ंयातून पाणी तर येणारच ना..हाच तर खरा झणझणीतपणा खान्देशाचा...चला तर रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele
More Recipes
- गवारीच्या शेंगाची भाजी (gavarichya shengachi bhaji recipe in marathi)
- चमचमीत खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
- मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
- खान्देशी दाणे लावून गवारीची भाजी (dane laun gavarachi bhaji recipe in marathi)
- आंबा शेवया खीर (amba sevaiya kheer recipe in marathi)
टिप्पण्या