वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा (vatli dal bharda recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#KS5
#मराठवाडा स्पेशल
#वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा

वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा (vatli dal bharda recipe in marathi)

#KS5
#मराठवाडा स्पेशल
#वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपहरभरा डाळ
  2. 1मोठा कांदा
  3. 6-7हिरवी मिरची
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 6-7कढीपत्ता पाने
  12. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  13. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम हरभरा डाळ स्वच्छ धून ती 3-4 तास भिजत ठेवणे. नंतर त्या डाळीतील पाणी काढून घेणे. व मिक्सर मधून थोडीशी जाडसर वाटून घेणे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जीरे याची पेस्ट करून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालावे. तेल थोडे जास्त लागते.तेल गरम झाले कि मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता याची फोडणी करून घेणे. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.आता या मध्ये मिरचीचा ठेचा, हळद घालून 2-4 मिनिटे परतून घेणे.व थोडी कोथिंबीर घालावी.

  3. 3

    आता या मध्ये वाटून घेतलेली डाळ घालावी. व छान त्यात परतून घेणे. चवीनुसार मीठ घालावे. 10 मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी. मधून झाकण काढून डाळ हलवून घेणे. जशी जशी वाफ येईल तशी डाळ मोकळी होऊ लागते.

  4. 4

    छान वाफ आली कि डाळ ही मस्त शिजते व मोकळी होते.आता वरून लिंबू पिळून घेणे व कोथिंबीर, कांदा घालून सर्व्ह करावी.मस्त चटपटीत खमंग वाटली डाळ तयार झाली.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes