भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#KS8 महाराष्ट्राचे स्ट्रीट फूड
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये लोक घड्याळाच्या काट्यावर चालत असतात सकाळी सातला बाहेर पडलेली लोकं संध्याकाळी घरे नऊ-साडेनऊला घरी पोहोचतात संध्याकाळच्या वेळेत भूक लागल्यावर ती वडापाव, पाणीपुरी, पॅटीस, भुर्जी पाव असे रस्त्यावरचे ठेले लोकांना भुरळ घालतात घरी परतत असताना बरेच जण हे खाऊन आपली भूक शमवतात सर्वांच्या खिशाला परवडणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ सर्वांनाच प्रिय असतात... भुर्जी पाव आज सुद्धा स्ट्रीट फूड पोटभरीचा आणि स्वस्त सुद्धा आहे तर मी आज तुम्हांला भुर्जीपाव रेसिपी दाखवणार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
३ लोकांसाठी
  1. 2कांदे
  2. 2टोमॅटो
  3. कोथिंबीर
  4. 2 चमचेलाल तिखट
  5. 1 चमचागरम मसाला
  6. 4अंडी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कढई तापत ठेवावी चार चमचे तेल घालावे नेहमीपेक्षा जरा जास्त तेल वापरावं यामध्ये दोन कांदे कट करून परतून घ्या कांदा परतल्यावर टोमॅटो बारीक कट करून परतून घ्या कोथिंबीर घाला

  2. 2

    कांदा टोमॅटो ला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या लाल तिखट मीठ गरम मसाला घालून परता धनेजिरे पूड घाला चार अंडी फोडून कढईत टाकावे चमच्याने हलवा तेलात परता गॅस ची फे्लम मोठी ठेवा आणि उलथन्याने सतत हलवत राहा

  3. 3

    उलथण्याने सतत परतत राहा दोन मिनिटात तुमची भुर्जी तयार होईल गुरुजी प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर घाला आणि सर करा त्याच पॅन मध्ये बटर सोडून पाव भाजून घ्या

  4. 4

    तुमचा ठेले स्टाइल भुर्जीपाव रेडी आहे

  5. 5

    गरम गरम भुर्जी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes