पानवडेची भाजी (panvadechi bhaji recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#KS3 थीम 3 : विदर्भ
रेसिपी क्र. 3
ममता भांदककर मॅडम यांनी लाईव्ह दाखवलेली, रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाली होती. घरात आवडली सर्वांना.

पानवडेची भाजी (panvadechi bhaji recipe in marathi)

#KS3 थीम 3 : विदर्भ
रेसिपी क्र. 3
ममता भांदककर मॅडम यांनी लाईव्ह दाखवलेली, रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाली होती. घरात आवडली सर्वांना.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 -25 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1/4 कपउडीद डाळ वाटलेली
  2. 2 टेबलस्पूनवाटलेला मसाला(खोबरे किस, खसखस, कोथिंबीर, लसूण, आलं)
  3. 1कांदा
  4. थोडी कोथबिंर
  5. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनधने पावडर
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. 1.5 टेबलस्पूनतेल
  11. पाणी

कुकिंग सूचना

20 -25 मिनिटे
  1. 1

    उडीदडाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून,पाण्यात रात्रभर भिजत घालणे. सकाळी पाणी निथळून घेणे. मिक्सरवर बारीक वाटून घेणे.

  2. 2

    खोबर्‍याचा किस, खसखस, लसूण,आलं, कोथिंबीर एकत्र करून मिक्सर मधून मसाला वाटून घेणे. खसखस, खोबर्‍याचा किस तव्यावर थोडेसे गरम करून घेणे.

  3. 3

    कांदा,कोथिंबीर बारीक चिरून घेणे.गॅसवर कढई तापत ठेवून, त्यात तेल घालणे.तेल तापले की, त्यात कोथिंबीर व तमालपत्र घालणे. नंतर कांदा घालून गुलाबी सर भाजून घेणे.

  4. 4

    कांदा भाजून झाल्यावर वाटलेला मसाला घालून 3-4 मिनिटे परतवून घेणे.सर्व मसाले घालून 2-3 मिनिटे परतवून घ्यावे.

  5. 5

    मसाला भाजून झाल्यावर त्यात 1/2 कप व वर थोडे पाणी घालून हलवून घ्यावे व झाकण ठेवून, 5 मिनिटे उकळून घ्यावे.मसाला छान शिजतो.

  6. 6

    नंतर पुन्हा 1 कप भरून पाणी घालावे. त्याला उकळी येऊ द्यावी. वाटलेल्या डाळीत थोडे लाल तिखट व मीठ घालून मिक्स करून घेणे.

  7. 7

    रस्त्याला उकळी आली की, डाळीच्या पिठाचे पातळ, मध्यम-छोटे वडे हातावर थापून घेणे व रस्स्यात सोडणे.सर्व वडे सोडून झाल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5-7 मिनिटे शिजू द्यावे.

  8. 8

    वडे रस्स्यातील पाणी शोषून घेतात.त्यामुळे मध्यम घट्टसर रस्सा तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes