वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. ५-६ वांगी
  2. 2मध्यम आकाराचे बटाटे
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरलेली
  6. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टेबलस्पूनधणेपूड
  9. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनजीरे पूड
  11. 1 टीस्पूनहळद पावडर
  12. चवीनुसारमीठ
  13. चिमुटभरहिंग
  14. तेल फोडणी करिता

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    पॅनमध्ये तेल घ्यावे. तेल चांगले गरम झाले की, त्यात जीरे,मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडली की, त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा एक मिनिट लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात हिंग,आले लसूण कोथिंबीर ची पेस्ट घालावी. एक मिनिट होऊ द्यावी, नंतर यामध्ये, तिखट,धने पावडर, जीरे पावडर, हळद, गरम मसाला टाकून चांगले मिक्स करून घ्यावे

  2. 2

    व यात कसुरी मेथी, चिरलेला टोमॅटो,आणि मीठ घाला व मिक्स करून एक मिनिट झाकण ठेवून होऊ द्यावा.

  3. 3

    (वांगी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. एका वांग्याच्या चार ते सहा फोडी होती एवढ्या आकाराच्या त्या चिराव्यात. जास्त लहान काप करु नये. आलू चे साल न काढता त्याचे देखील मोठे काप करून घ्यावे व पाण्यामध्ये डुबवून ठेवावे.) त्यात चिरलेले आलुवांगे घालून चांगले मिक्स करून, वांगे व बटाटे पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यावे, पाणी न टाकता. (वांगे आलू जेवढे तेलात शिजतील तेवढी भाजी रुचकर,.तर्रीदार बनते.)

  4. 4

    नंतर वरून झाकन ठेवून त्यात पाणी ठेवावे म्हणजे भाजी बुडाला करपत नाही, तसेच मध्ये मध्ये २ त३ दा परतुन घ्यावे, नंतर छान तेलात वांगी बटाटा ८० ते ९० टक्के शिजली की झाकनात ठेवलेलं पाणी टाकून रस्ता करून ढवळून घ्यावे,

  5. 5

    अाणि १० मिनिटे मंद आचेवर उकळी येवू घ्यावी नंतर कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावी,अश्या प्रकारे वांगी बटाटा रस्सा भाजी तयार आहे पोळी, भाकरी, भाता सोबत सर्व्ह करावे ़खुप छान लागते 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes