अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४-५ मिनिटे
३-४
  1. 2-3अळूची पाने
  2. 1/4 कपबेसन
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचं पीठ
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. १/८ टीस्पून हिंग
  6. 1/4 टीस्पूनतिखट
  7. 1/4 टीस्पूनओवा
  8. 3-4 टेबलस्पूनपाणी...आवश्यकतेनुसार
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

४-५ मिनिटे
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली.शिरा काढून घेतल्या.त्याची पाने चिरून घेतली.बाकी साहित्य पण घेतले.

  2. 2

    भजी साठी बॅटर बनवण्यासाठी बेसन,तांदळाचं पीठ,मीठ,हळद,हिंग,तिखट,ओवा आणि पाणी घालून नीट मिक्स करून घेतलं.

  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात बोटांच्या साहाय्याने भजी सोडली.मस्त कुरकुरीत तळून घेतली.

  4. 4

    सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेतली....मस्त गरमागरम कुरकुरीत भजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes