राम भंडार ची लस्सी (lassi recipe in marathi)

#KS8
#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र
#राम भंडार ची लस्सी
मंडळी नागपूर मध्ये महाल भागात प्रसिद्ध असलेली राम भंडाराची लस्सी नाव घेतले की तोंडाला पाणी सुटते...भल्यामोठ्या पातेल्यामध्ये मलाई चे दही पाहता-पाहता कधी संपत कळत सुद्धा नाही सकाळपासून रात्रीपर्यंत लस्सी पिणार्यांची गर्दी असते..
मेन बाजारपेठ असल्यामुळे लोक खरेदीला आले की या मस्त थंडगार लस्सी चा आस्वाद घेतात.. मी लहानपणापासून पहात आली आहे... आजही नागपूरला गेली की,आठवणीने राम भंडार ची लस्सी पिते अजूनही ती चव... कधीही न विसरणारी... चला तर मग पाहूया रेसिपी......

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पातेल्यात गोड दही घ्या आणि त्याला छान घुसळून घ्या
- 2
दह्यामध्ये साखर घालून छान मिक्स करून घ्या. आवश्यतेप्रमाणे थोडे दूध आणि दह्याची मलाई घाला आणि रवीने ढवळून घ्या
- 3
तयार लस्सी छान मिक्स करत रहा.त्याला अगदी क्रिमी होत पर्यंत मिक्स करा.
- 4
तयार झाली की लस्सी काचेच्या ग्लास मध्ये टाका वरून मस्त मलाई आणि बर्फाची क्रश तुकडे घालून थंडगार राम भंडार ची लस्सी सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)