झटपट कुकरमध्ये होणारा व्हेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

झटपट कुकरमध्ये होणारा व्हेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
3- सर्व्हींग
  1. 1 ग्लासबासमती तांदूळ
  2. 1कांदा
  3. 1बटाटा
  4. 1 टीस्पूनआल-लसूण पेस्ट
  5. 1गाजर
  6. 1/2 कपबीन्स
  7. 1/2 कपमटार
  8. 2 टेबलस्पूनतुप
  9. 1 टीस्पूनजिर
  10. 2लाल सुक्या मिरची
  11. 2तमालपत्र
  12. 3-4 काळीमीरी,
  13. 1 लवंग,
  14. 1दालचिनी,
  15. 1वेलची,
  16. 1चक्रफुल,
  17. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेऊ. त्यानंतर गॅसवर कुकरमध्ये तुप गरम करुन त्यात प्रथम काजू तळून घेऊ त्यानंतर त्यात सर्व खडा मसाला घालून परतून घेऊ मग कांदा, आल-लसूण पेस्ट घालून परतून घेऊ.

  2. 2

    आता बटाटा आणि इतर सर्व भाजी घालून घेऊ मीठ चवीनुसार घालून सर्व छान परतून घेऊ त्यानंतर 1-2 मिनिट झाकण ठेवुन देऊ गॅसची फ्लेम बारीक ठेवावी.त्यानंतर बासमती तांदूळ,तळलेले काजू घालून मिक्स करुन घेऊ

  3. 3

    आता हे सर्व परतुन झाल्यावर पाणी घालून 1 शिट्टी करून घेऊ मी 1ग्लास तांदूळ घेतला होता म्हणून मी 11/2 ग्लास पाणी घातले.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर आपण बघू शकता राइस छान मोकळा झाला आहे.गरमागरम सर्व्ह करा आणि हा राइस गरमच खूप छान लागतो.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes