व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1कांदा
  3. 1/4 कपमटार
  4. 1/4 कपगाजर
  5. 1/4 कपफरसबी
  6. 3-4लवंग
  7. 3-4काळी मिरी
  8. 1चक्री फुल
  9. 1 इंचदालचिनी
  10. 1तमाल पत्र
  11. 1/2 टेबलस्पूनजिरें
  12. 1/4 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  13. 1 टेबलस्पूनमीठ
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1 टेबलस्पूनतूप
  16. 7-8तळलेले काजू
  17. 7-8मनुके(ऐच्छिक)
  18. (भाज्या तुमच्या आवडीच्या)

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे.

  2. 2

    आपल्या आवडीच्या सर्व भाज्या स्वच्छ धुऊन चिरुन घ्याव्यात.

  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये तेल घेऊन ते तापल्यावर त्यात जिरें घालावे. जिरें फुटल्यावर त्यात एकेक करून सर्व खडे मसाले घालावेत आणि परतून घ्यावेत.

  4. 4

    त्यात कांदा घालावा. कांद्याचा रंग बदलल्यावर त्यात एकेक करून सर्व भाज्या घालाव्यात आणि परतून घ्याव्यात.

  5. 5

    भाज्या परतलेल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ उपसून घालावेत. सर्व एकत्र परतून घ्यावे. दीड कप गरम पाणी घालावे. मीठ घालून ढवळून गॅस बारीक करून भात शिजवून घ्यावा.

  6. 6

    शिजलेल्या भातावर काळी मिरी पावडर भुरभुरावी. व तळलेले काजू घालून डीश सॅलड किंवा रायत्या बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes