हैदराबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#br

हैदराबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

#br

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 1/2 किलोचिकन
  2. 1/2 किलोबासमती राइस
  3. 5मोठे कांदे
  4. 8-10 लसूण पाकळ्या
  5. 2 इंचआलं
  6. 2मुठी कोथिंबीर
  7. 1मुठ पुदिन्याचे पान
  8. 2 टेबलस्पूनदूध
  9. 1/4 टीस्पूनरोझ वॉटर
  10. 20-25 केशर काड्या
  11. 2 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  12. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. चवीनुसारमीठ
  17. 1 कपदही
  18. 3 टेबलस्पूनतूप
  19. आवश्‍यकतेनुसार खडे मसाले

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    पाच कांद्यापैकी चार कांदे मी उभे कापून घेतले आणि साधारण दोन टेबलस्पून तेलात झाकण ठेवून फ्राय करून घेतले... एकावेळी दोन कांदे फ्राय करून घ्या... सर्वच एकदा नको... ह्या ऐवजी तुम्ही बरिस्ता वापरू शकता... चार कांद्यापैकी दोन फ्राय कांदे मी वाटणात वापरले... एक फ्राय कांदा तसाच चिकन मध्ये घातला, आणि एक गार्निशिंगसाठी ठेवला...

  2. 2

    वाटणा मध्ये वर फ्राय केलेले दोन कांदे, लसून पाकळ्या, आलं, मुठभर कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने वापरली... आवश्यकता वाटली तर वाटताना पाणी घाला... आवडत असल्यास हिरवी मिरची सुद्धा घालू शकता... दुधामध्ये केशर आणि रोझ वॉटर घालून केशर व्यवस्थित भिजू द्या...

  3. 3

    चिकन व्यवस्थित स्वच्छ धुऊन त्यात सर्व मसाले आणि मीठ घालून मिक्स करा... मग त्यात दही आणि वाटण घालून व्यवस्थित मिसळून घ्या... आपण नंतर मीठ ऍड करत नाही आहोत... त्यामुळे सर्व मीठ इथेच घाला...

  4. 4

    एक फ्राय केलेला कांदा घाला... सर्व छान व्यवस्थित मिसळून किमान अर्धा तास मॅरीनेट होऊ द्या...

  5. 5

    चिकन शिजवण्यासाठी कांदा फ्राय केलेली कढई वापरली... कांद्यातून बरच तेल शिल्लक राहतं... त्यात दोन टेबलस्पून तूप ऍड करा... पाचपैकी एक कांदा बारीक चिरून घेऊन तेलामध्ये सॉफ्ट करून घ्या... कांदा सॉफ्ट झाल्यावर चिकन घाला... तुम्ही तेला ऐवजी संपूर्ण तुपाचा वापर करू शकता, पण असं केल्याने बिर्याणी थंड झाल्यानंतर तूपाळ लागते... तरीही आपल्या आवडीनुसार... पूर्ण बिर्याणीसाठी मी साधारण तीन टेबलस्पून तूप आणि पाच टेबलस्पून तेल वापरलं...

  6. 6

    खडे मसाले घालून चिकन व्यवस्थित शिजवून घ्या... चिकन शिजवताना पाण्याचा वापर अजिबात करू नका... बिर्याणी तुम्हाला किती ड्राय हवी ह्या हिशोबाने चिकन ड्राय करून घ्या...

  7. 7

    भात शिजवण्यासाठी पाणी पूर्ण उकळवून घ्या... पाणी उकळताना त्यात चमचाभर तेल, खडे मसाले आणि मीठ घाला... मी पाण्यामध्ये एक टेबलस्पून पेक्षा जास्त मीठ घातलं आहे आणि साधारण अडीच लिटर पाणी वापरला आहे... पाणी उकळल्यावर धुतलेले तांदूळ घालून, तीन ते चार मिनिटं फुल गॅस वर आणि सात ते आठ मिनिटं मध्यम गॅस वर तांदूळ शिजवले... तांदूळ साधारण 90 टक्के शिजवून घ्या... त्यातला पाणी काढून, पसरून थंड करून घ्या...

  8. 8

    एका जाड बुडाच्या भांड्याला उरलेला तूप लावून पसरवून घ्या... शिजवलेला भातापैकी अर्धा भात तळाला पसरा आणि मग त्यावर चिकन चा लेयर द्या...

  9. 9

    चिकनच्या लेअर वर उरलेला संपूर्ण भात पसरा आणि लेव्हल करून घ्या... जास्त कॉन्टिटी मध्ये बनवणार असाल तर तुम्ही जास्त लेयर्स बनवू शकता... उरलेला एक फ्राय कांदा, उरलेली मुठभर कोथिंबीर, केशर आणि रोझ वॉटर चे मिश्रण सर्व वरून पसरून घ्या... घट्ट झाकण ठेवून लहान गॅसवर दहा मिनिटे वाफ घ्या...

  10. 10

    आपली हैदराबादी चिकन बिर्याणी तयार आहे...

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes