चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
  1. 10-12 केसर काड्या
  2. 2 टेबलस्पूनदूध
  3. 1 कपबासमती तांदूळ
  4. खडे मसाले आवडीनुसार
  5. 1-2 हिरवी किंवा ओली लाल मिरची
  6. 2 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  7. 2मोठे कांदे
  8. आवश्यकतेनुसार तेल
  9. १ टेबलस्पून हळद
  10. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  11. 2 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. 3मोठे लाल टोमॅटो
  14. 1/2 कपदही
  15. 1/2 किलोचिकन
  16. सजावटीसाठी..
  17. 1बटाटा
  18. 1मोठा कांदा
  19. 2बुड कोथिंबीर
  20. 5-6 काजू

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    दुधामध्ये केसर घालून भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्या... हे केसर कमीत कमी दहा मिनिटे भिजले गेलं पाहिजे... दूध कोमट असेल तर उत्तम...

  2. 2

    तांदूळ स्वच्छ धुऊन पंधरा ते वीस मिनिटं भिजवून घ्यावे... मग त्यातला पाणी काढून त्यामध्ये खडे मसाले आणि मिरच्या घालून शिजवून घ्यावे... शिजवलेला भात पाणी काढून पसरून थंड होण्यासाठी ठेवून द्यावा... खडे मसाले आवडत नसल्यास त्याची पुरचुंडी बांधून तांदळात घालून शिजवावे वेगळ करण सोप्प होतं...

  3. 3

    दुसर्‍या भांड्यात तीन ते चार टेबलस्पून तेल तापवून घ्यावं... आणि आवडीनुसार खडे मसाले घालावे... मग आलं-लसणाची पेस्ट आणि कांदा घालून परतून घ्यावे... कांदा सॉफ्ट झाल्यावर त्यात हळद, मिरची पावडर, बिर्याणी मसाला आणि चवी नुसार मीठ घालावं... मसाले परतल्यावर टोमॅटो प्युरी घालावी आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे...

  4. 4

    मग त्यामध्ये दही घालावे... दही पूर्ण मिक्स झाल्यावर त्यामध्ये चिकन घालावे आणि चिकन शिजवून घ्यावे... चिकन शिजवताना आवश्यकता वाटले वाटली तरच पाणी घालावे... अन्यथा बिनपाण्याने छान घट्ट ग्रेव्ही होते...

  5. 5

    चिकन शिजल्यावर त्यातली थोडी ग्रेव्ही बाजूला काढून घ्या... आणि मग त्यावर भाताचा लेयर पसरून घ्यावा... तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर एकापेक्षा जास्त लेअर बनवू शकता... काढून ठेवलेली ग्रेव्ही नंतर बिर्याणी जर ड्राय वाटली तर वरून घालू शकतो... ऑप्शनल आहे... भाताचा लेयर पसरवून झाल्यावर त्यावर दूधा मध्ये भिजवलेले केसर घालावे आणि अगदी मंद गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिट वाफवून घ्यावं...

  6. 6

    बिर्याणी गरम होत आहे तोपर्यंत तिथपर्यंत सजावटीची तयारी... बटाट्याच्या उभ्या चिपा करून डीप फ्राय करून घ्या... कांदा उभा लांब चिरून फ्राय करून घ्या... कोथिंबीर बारीक चिरून घ्या... काजू डीप फ्राय करून घ्या सर्व वरून पसरून घ्या

  7. 7

    वरील सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार बिर्याणी वर अरेंज करून घ्या...

  8. 8

    आपली बिर्याणी तयार आहे गरमागरम सर्व्ह करावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes