आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#AsahiKaseiIndia
#No_Oil_recipe
घरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...
करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕

आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
#No_Oil_recipe
घरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...
करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

8-10 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 2मोठे उकडून घेतलेले पोटॅटो
  2. 1/2 कपगावरानी उकडून घेतलेले लाल चने (काबुली चने देखील वापरू शकता)
  3. 3 टेबलस्पूनहिरवी चटणी (मिरची + कोथिंबीर + पुदिना + 1/2 इंच अदरक)
  4. 2-3 टेबलस्पूनचिंच गुळाची चटणी
  5. 1/4 कपगोड दही
  6. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/2 टीस्पूनतिखट
  8. 1कांदा बारीक चिरलेला
  9. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  10. 2-3 टेबलस्पूनडाळींबाचे दाणे
  11. 1/4 कपबारीक शेव
  12. थोडीशी कोथिंबीर
  13. 4-5मठरी
  14. 1 टेबलस्पूनकच्च्या कैरीचे केलेले काप
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

8-10 मिनिटे
  1. 1

    पोटॅटो उकडून त्याचे काप करून घ्यावे. चने कुकर ला लावून दोन शिट्या देऊन शिजवून घ्यावे. डाळिंबाचे दाणे काढून ठेवावे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. हिरवी चटणी, चिंचगूळाची चटणी तयार करून ठेवावी.

  2. 2

    एका पसरट वाटी मध्ये सर्वप्रथम पोटॅटोचे काप व चने घ्यावे. त्यामध्ये एक टेबलस्पून हिरवी चटणी, चिंचगुळाची चटणी, तिखट, मीठ, दही घालून मिक्स करून घ्यावे. मिक्स केलेले हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यावे.

  3. 3

    आता यावरती परत एकदा चिंचगूळाची चटणी, हिरवी चटणी दही घालावे. कांदा घालावा. चिरलेला टोमॅटो घालावा. कैरीचे काप घालावे. मठरी बारीक करून घालावी. शेव घालून, कोथिंबीर घालावी. वरून चाट मसाला व तिखट भुरभुरावे. कोथिंबीर घालावी...
    तयार चटपटीत झणझणीत *आलू चना चाट* सर्व्ह करावी.... 💃 💕

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes