कोबी खेकडा पकोडा (kobi khekhda pakoda recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#cpm2 कोबी ह्या भाजीचे अनेक पदार्थ बनवता येतात

कोबी खेकडा पकोडा (kobi khekhda pakoda recipe in marathi)

#cpm2 कोबी ह्या भाजीचे अनेक पदार्थ बनवता येतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम बेसन पिठ
  2. 4 टेबलस्पुनतांदळाचे पिठ
  3. ३०० ग्रॅम तेल (तळण्यासाठी)
  4. चविनुसारमीठ
  5. 2मिरच्या बारीक कापलेल्या
  6. 1/4 टीस्पूनबारीक चिरलेले आले
  7. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनओवा
  9. 1 टीस्पूनक्रश केलेले धणे
  10. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  11. १५० ग्रॅम कोबी पातळ उभा चिरलेला
  12. 1/2 टीस्पूनजीरे
  13. 1कांदा उभा पातळ चिरलेला
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनतिखट
  16. 1/2 टीस्पूनधने पावडर
  17. 2-3 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    कोबी पकोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बाऊलमध्ये काढुन ठेवा कोबी व कांदा पातळ उभे चिरून ठेवा. मिरच्या व कोथिंबिर बारीक चिरून ठेवा आख्ये धणे क्रश करून ठेवा

  2. 2

    मोठ्या बाऊलमध्ये चिरलेली कोबी, कांदा, मिरच्या, आल, आललसुण पेस्ट, ओवा, क्रश केलेले धणे, चिलीफ्लेक्स, जीरे, हळद, धनेपावडर, तिखट व मीठ मिक्स करून मिश्रण हाताने चांगले ऐक जिव करा

  3. 3

    नंतर त्यात चिरलेली कोथिंबिर मिक्स करा

  4. 4

    नंतर त्यात थोडे थोडे बेसनपिठ व तांदळाचे पिठ मिक्स करून हाताने ऐक जिव करा नंतर त्यात २ टेबलस्पून गरम कडकडीत तेल मिक्स करा सर्व मिश्रण परत ऐकजिव करा

  5. 5

    कढईत तेल गरम करून त्यात कोबीचे पकोडे तळुन काढा

  6. 6

    गरमागरम कोबी खेकडा पकोडा प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत पुदिनाची चटणी व वडापावाची चटणी देऊन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Similar Recipes