कोबीची खेकडा भजी

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#फोटोग्राफी

कोबीची खेकडा भजी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 35 मिनिटे
दोन ते तीन व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीउभा पातळ चिरलेला कोबी
  2. 1/2उभा पातळ चिरलेला कांदा
  3. 7ते 8 काड्या कोथंबीर
  4. 2ते 3 बारीक मिरच्या कापून
  5. 1 चमचाआले-लसूण पेस्ट
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1 चमचाहळद
  8. 1 चमचाधने पावडर
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 वाटीबेसन
  11. 1/2 वाटीतांदळाचे पीठ (टीप-भजी मध्ये तांदळाचे पिठ घातल्याने भजी खुसखुशीत होते)

कुकिंग सूचना

30 ते 35 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम उभा चिरलेला कोबी, कांदा,कोथंबीर व मिरची एकत्र करून घ्या. त्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पूड, मीठ, व आलं-लसणाची पेस्ट टाकून द्या. आता त्यामध्ये अर्ध बेसन, थोडसं तांदळाचे पीठ टाकून घ्या. हे मिश्रण एकत्र करून थोडा वेळ ठेवून द्या. त्यामुळे कोबी व कांदा आपापलं पाणी सोडेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर पुन्हा त्यामध्ये उरलेलं बेसन पीठ व तांदूळ पीठ टाकून मिक्स करून घ्या.(टिप :- या भजीसाठी पाण्याचा वापर करू नये.)

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर तेलामध्ये भजी सोडा. व सोनेरी होईपर्यंत तळा. अशा प्रकारे आपली कोबीचे खेकडा भजी तयार होईल. धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

Similar Recipes