व्हेज पालक पुलाव (veg palak pulav recipe in marathi)

#cpm4
#Week4
#व्हेज_पालक_पुलाव...🌱🌿😋
पालक...वर्षातील बाराही महिने मिळणारी ही पालेभाजी..आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाचा मेंबर...कारण निसर्गानेच या हिरव्यागार पालकाकडे लोह,iron चे पालकत्व बहाल केलंय...आणि ही जबाबदारी पालक इमानेइतबारे पार पाडत आहे... त्यामुळेच जी मंडळी आपल्या आहारात नित्य पालकाचे या ना त्या रुपात सेवन करतात..त्यांच्या शरीरात लोह, हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम नीट ठेवून अॅनिमिया दूर करण्याच्या जबाबदारीचं काम पालक आज्ञाधारी बालकासारखं करत असतो..म्हणजे बालक पालक या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या वठवून आपले महत्त्व देखील कायम राखत आहे...
आपण देखील आपल्या मुलांचे पालकत्व निभावताना कधी बालक होऊन त्यांना समजून घेतो तर कधी स्वत:च हट्टी बालक होतो...त्याचवेळेस लहानपणी लहान सहान गोष्टींवर आपल्यावर अवलंबून असणारी बालकं काहीवेळेस अचानक त्यांच्यात मोठेपणा येतो ,कुठून तरी शहाणपण येतं त्यांना ..आणि त्या नेमक्या क्षणी कधी ते आपलेच पालक होतात हे आपल्याला कळत देखील नाही...😊....पटली ना ही बालक पालक chemistry..😍
चला तर मग व्हेज पालक पुलाव या स्वादिष्ट पौष्टिक रेसिपीकडे जाऊ या..
व्हेज पालक पुलाव (veg palak pulav recipe in marathi)
#cpm4
#Week4
#व्हेज_पालक_पुलाव...🌱🌿😋
पालक...वर्षातील बाराही महिने मिळणारी ही पालेभाजी..आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाचा मेंबर...कारण निसर्गानेच या हिरव्यागार पालकाकडे लोह,iron चे पालकत्व बहाल केलंय...आणि ही जबाबदारी पालक इमानेइतबारे पार पाडत आहे... त्यामुळेच जी मंडळी आपल्या आहारात नित्य पालकाचे या ना त्या रुपात सेवन करतात..त्यांच्या शरीरात लोह, हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम नीट ठेवून अॅनिमिया दूर करण्याच्या जबाबदारीचं काम पालक आज्ञाधारी बालकासारखं करत असतो..म्हणजे बालक पालक या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या वठवून आपले महत्त्व देखील कायम राखत आहे...
आपण देखील आपल्या मुलांचे पालकत्व निभावताना कधी बालक होऊन त्यांना समजून घेतो तर कधी स्वत:च हट्टी बालक होतो...त्याचवेळेस लहानपणी लहान सहान गोष्टींवर आपल्यावर अवलंबून असणारी बालकं काहीवेळेस अचानक त्यांच्यात मोठेपणा येतो ,कुठून तरी शहाणपण येतं त्यांना ..आणि त्या नेमक्या क्षणी कधी ते आपलेच पालक होतात हे आपल्याला कळत देखील नाही...😊....पटली ना ही बालक पालक chemistry..😍
चला तर मग व्हेज पालक पुलाव या स्वादिष्ट पौष्टिक रेसिपीकडे जाऊ या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवावेत तोपर्यंत पालक स्वच्छ निवडून धुऊन पालक ची पाने गरम पाण्यात रंग बदलेपर्यंत शिजवून घ्यावेत नंतर लगेच ही पाने थंड पाण्यात घालून ठेवावेत म्हणजे रंग तसाच हिरवागार राहतो नंतर या पानांची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी. पालक पुलावाला हिरवागार रंग यावा म्हणून या पेस्टमध्ये किंचीत हिरवा खायचा रंग घालावा हे ऑप्शनल आहे.
- 2
एकीकडे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे आलं लसूण मिरची पेस्ट करून घ्यावी आणि धुतलेल्या तांदळात मका,भिजवलेले हिरवे मूग घालून, थोडे मीठ घालून भात शिजवून घ्यावा.
- 3
आता एका कढईत बटर व थोडे तेल घालावे मिश्रण तापले की मोहरी जीरे घालावेत.. मोहरी जीरे तडतडले की हिंग काळी मिरी लवंगा तमालपत्र लसणाचे तुकडे घालून फोडणी व्यवस्थित परतून घ्यावी
- 4
आता यामध्ये कांदा घालून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा नंतर यामध्ये हळद किंचित साखर घालावी व मिश्रण व्यवस्थित परतावे पुढे यामध्ये पालक ची पेस्ट घालून व्यवस्थित ढवळावे आणि चवीनुसार मीठ घालावे आपण आधी भातामध्ये मीठ घातलेले आहे हे लक्षात ठेवा आणि मिश्रण छान पैकी परतून घ्यावे.
- 5
आता वरील मिश्रणात शिजवलेला भात घालून व्यवस्थित परतून घ्या आणि वरून थोडेसे तूप घालून पुलावाला दोन-तीन वाफा काढून घ्या.तयार झाला आपला चमचमीत व्हेज पालक पुलाव..
- 6
एका डिश मध्ये तयार झालेला वेज पालक पुलाव वाढून सोबत कांदा टोमॅटो काकडी लिंबू यांचे काप,दही,पापडासोबत सर्व्ह करा.
- 7
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #मंगळवार #पुलाव वरण-भात तूप लिंबू हे नैवेद्याच्या पानावरचा मुख्य पदार्थ.. साधारणपणे नेवैद्य म्हटले की आपण सात्विक भोजन करत असतो कारण आपण जसं भोजन करतो आहार घेतो त्याप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. सात्विक राजस आणि तामसी या त्या वृत्ती आणि त्याला अनुसरून असलेला सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.. याबद्दल आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या वृत्ती सात्विक शांत असाव्यात आणि आपण मनाने देवाच्या अधिक जवळ असावे देवाचे आपल्याला चिंतन करता यावे यासाठी सात्विक आहाराची योजना केली आहे. म्हणून मग शक्यतोवर बिना कांदा लसूण याचा नैवेद्य केला जातो. नैवेद्यासाठी बहुतेक वेळा मसाले भात केला जातो पण या मध्ये थोडं व्हेरिएशन म्हणून मी कधी कधी हा बिना कांदा लसणाचा व्हेज पुलाव करते.. तेवढाच चवीमध्ये बदल..देव शेवटी भावाचा भुकेला.. चला तर आज आपण नैवेद्यासाठी पण चालणारा व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
कॉर्न पालक सँडविच (corn palak sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwitchनाश्त्यासाठी कॉर्न पालक सँडविच आणि कॉफी असा साधा बेत कायम मला आवडतो.आणि या आठवड्याच्या चलेंज साठी नेमके keyword मध्ये सँडविच आले. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
क्रीम आफ स्पिनच सूप...पालक सूप. (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - Spinach Soup तुम्हांला "Popeye - The Sailor man "ही कार्टून नेटवर्क वरची serial आठवते कां..त्यातील Popeye घ्या खिशात कायम पालक प्युरीची बाटली असायची .Popeye ला जेव्हां ताकदीचं काम करायचं असेल तेव्हां तो ही बाटली उघडून घटाघटा पालक प्युरी प्यायचा ..मग त्याच्या अंगात खूप ताकद यायची तेव्हां तो त्याचे biseps दाखवायचा..आणि मग कुठलंही काम तो चुटकीसरशी करायचा .कित्येक पिढ्या हे कार्टून बघत मोठ्या झाल्या..मुलांना पौष्टिक पालक खाऊ घालण्यात हे कार्टून यशस्वी होतं दरवेळेला..किती पगडा आहे ना..😄😄 पालकची भाजी खाण्यात टाळाटाळ करणारी माझी मुलं Popeye बघून पालक सूप प्यायला शिकलेत. पालक ही लोह,iron चा भरपूर स्त्रोत असलेली पालेभाजी..Iron जास्त म्हणजे आपोआपच हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काम करते..म्हणजेच RBcs वाढतात.. भरपूर ताकद मिळते या पौष्टिक सुपामधून..त्यामुळे मग आळस,मरगळ जाऊन मुलं सदैव energetic...आणि आपल्याला तेच हवं असतं..बरोबर ना.. चला तर मग आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक स्वादिष्ट असे क्रीम आॅफ स्पिनच सूप करु या..यात लिंबूरस घालायचा कारण लिंबातील Vit.C हे पालकामधील iron रक्तात absorb करायला मदत करते.परिणामी शरीराला लवकर iron चा पुरवठा होतो.. Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 #spinach soup पालेभाज्यामध्ये पालक भाजी ही जास्त पौष्टीक आहे पालकात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर अंश असतात ॲनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे पालक रक्तशुद्ध करते हाडांना मजुबत बनविण्याचे काम करते पालकातील अ जिवन सत्वामुळे डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात रक्तदाब नियंत्रणात राहातो अशा बहुगुणी पालक भाजीचा आपल्या आहारात नेहमीच समावेश केला पाहिजे चला तर आज पालकाचे पौष्टीक सुप रेसिपी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे पालक सर्वांनी खावा, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, उष्णता कमी करते , स्मरणशक्ती वाढवते , डोळ्या साठी चांगला आहे मी आज बनवत आहे पालक सूप Smita Kiran Patil -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (Immunity booster palak soup recipe in marathi)
#immunity#soupपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.अॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात. पालक वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकतो भाजी ,पराठे ,स्मूदी ड्रिंक्स, सुपमी तयार केलेले सूप खूप पौष्टिक आहे या पासून प्रोटीन, कॅल्शियम , लोह शरीराला मिळते आणि शरीर बळकट बनते बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. बघू या रेसिपी तून सूप कसे तयार केले. Chetana Bhojak -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक मध्ये भरपूर प्रमाणत लोह आणि सत्व आहेत आपल्याला माहीतच आहे, पण लहान मुलांना त्याचे महत्व कसे कळणार ...आया ना पोपाय द सेलर मऍन कार्टून दाखवुन खाऊ घालावे लागते , पन तेच पालक आपन पनीर घालून केले तर मात्र मुलं आवडीने खातात Smita Kiran Patil -
व्हेज Chifferi Rigati पास्ता in White sauce..(veg chiifferi rigati pasta recipe in marathi)
#EB10#W10#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#व्हेज_Chifferi_Rigati_पास्ता_ in _white_sauce.. इटालियन पिझ्झा, पास्ता या पदार्थांनी आपल्या जिभेला कधी आणि कसं वेड लावलंय हेच कळत नाही.. या पिझ्झा ,पास्ताला भारतीय सुगरणींनी अशी काही गोजिरवाणी रुप आणि चमचमीत चव बहाल केली की पूछो मत.😋.त्यामुळेच ही इटालियन भावंड आपल्या सर्वांच्या किचनचे कल्लाकार झालेत..आणि अधूनमधून celebrities सारखे आपल्या समोर अवतरतात..आणि आपल्या चवीने सर्वांना तृप्त करतात..😍 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
हेल्दी मिक्स व्हेज सलाड (healthy mix veg salad recipe in marathi)
#HLR#हेल्दी_रेसिपीज..#हेल्दी_मिक्स_व्हेज_सलाड....🥗🥗 श्रावण महिना, गौरी गणपती, नवरात्र,दसरा,दिवाळी या सणासुदीच्या दिवसात गोड तिखट पदार्थांचा नुसता महापूर असतो..रोज काही ना काही कारणांनी आपण मस्त चमचमीत पदार्थ करुन खातो आणि जिभेचे चोचले पुरवतो..😀😋..यावेळेस जरा शरीराच्या मागणीकडे काणाडोळाच करतो..गोड,तेलकट,तुपट,खमंग ,चटपटीत,चमचमीत पदार्थांवर यथेच्छ ताव मारणं सुरु असतं..😜..दिवाळी संपली की मग सुरु होतो healthy,detox recipes चा सिलसिला...😍..कारण आपल्या शरीराचे आपल्यालाच ऐकून घेऊन आपल्या शरीराची काळजी घेत योग्य निगा राखली पाहिजे ..हे फक्त आपणच आपल्यावर थोडी सक्ती लादून ,जिभेचे चोचले बाजूला ठेवून करु शकतो..*आहार हेच औषध*असं म्हटलचं आहे.. Healthy food=Healthy body= Healthy mind...असं समीकरण आहे😀..चला तर मग अशाच एका सोप्या पण पौष्टिक चविष्ट रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
पालक सूप शोरबा (palak soup shorba recipe in marathi)
#hs #शुक्रवार की वर्ड-- पालक सूप या आधी मी पालक सूपची रेसिपी केलीये.. म्हणून मग यावेळेला पालक सूप चा भाऊ पालक शोरबा करायचं ठरवलं..😂..सूप प्रमाणेच अत्यंत पौष्टिक ,पचायला हलके,लोहाची मात्रा अधिक असते.. हिमोग्लोबीन ची पातळी वाढवण्यास मदत करते..फक्त एकच फरक असतो की शोरबा हे सूप पेक्षा थोडे पातळ असते..बाकी शेम टू शेम..😋😂 Bhagyashree Lele -
पारंपारिक पालक.. (paramparik palak recipe in marathi)
#लंच # साप्ताहिक लंच प्लॅनर शनिवार हिवाळ्यात मिळणारा हिरवागार पालक म्हणजे डोळ्यांना सुख... तसं पाहिला गेले तर थंडीचा मोसम हा वेगवेगळ्या पालेभाज्यांचा फळभाज्यांचा.. या दिवसात भाजीबाजारात फेरफटका मारणे हे पण एक सुख असतं वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या अतिशय आकर्षक पणे टोपल्यांं मधून रचून ठेवलेले असतात. भाज्यांचा रंग ,ताजेपणा पाहूनच मन मोहून जाते आणि क्षणार्धात लहानपणीचे गाणे आठवते "आला भाजीवाला आला आला हो आला" "कोणी घ्यावा वांगी कोणी घ्या भोपळा.". मला एक गंमत आठवते. मी जेव्हा शाळेत शिकवायला होते.. तेव्हा शाळेमध्ये आम्ही टीचर्स मिळून मार्केट डे अरेंज करत असू.. त्यादिवशी छोटी छोटी मुले मुली भाजीवाले बनून टोपल्यातून भाज्या आणत आणि त्याची विक्री देखील करत..या निमित्ताने मुलांना भाज्यांची नावे ,प्रकार कळे..खूप मजा वाटायची त्यांच्याकडे बघून..हसत खेळत शिक्षण होत असे...मुलांचा उत्साह बघण्यासारखा..मुलांमध्ये लहान वयातच जेवणाची,भाज्यांची आवड निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न.. Fast food च्या जमान्यात मुलांना roots कडे नेण्यासाठी,आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी या साठीचा हा प्रकल्प... चला तर मग आपणही पारंपरिक पालक ची भाजी करुन आपली खाद्यसंस्कृती पुढे नेऊ या.. Bhagyashree Lele -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs #शनिवार की वर्ड--स्वीट कॉर्न हॉटेलमध्ये गेल्यावर टोमॅटो सूप च्या खालोखाल सर्वांच्या आवडीचे हे सूप.. यामध्ये काॅर्न बरोबर भरपूर भाज्या असल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे पोटभरीचे सूप.. निदान माझं तरी हे सूप प्यायल्यावर पोट भरते.. जेवायची देखील आवश्यकता मग मला नसते..😂चला थोडी वेगळी घरगुती रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsसप्टेंबर महिन्यात येणाऱ्या जागतिक शिक्षक दिनानिमित्त जगभरातल्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन!🙏cookpadतर्फे याचे स्मरण ठेवले गेले हे सुद्धा कौतुकास्पद आहे.एका मातीच्या गोळ्याला आकार देणे आणि त्यातून सुंदर अशी विद्यार्थीरुपी शिल्पकृती बनवणे हे अत्यंत अवघड काम शिक्षक करत असतात.ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो व त्यांच्या ज्ञानाचा समाज घडवण्यासाठी उपयोग केला जातो तो देश व त्याचे नागरिक हे सूज्ञ व सुजाण असेच निर्माण होतात,तिथेच प्रगतीची मुळे रुजतात.मी सुद्धा एका शिक्षिकेचीच मुलगी असल्याने शिक्षकांची तळमळ,विद्यार्थ्यांबद्द्लचे प्रेम,शाळेविषयी आदर,आपल्या पेशाशी एकनिष्ठता,संस्कारक्षमता हे माझ्या आईकडून खूप जवळून अनुभवले आहे.शिक्षकांचा खरा साथीदार असतो पालक!...आता इथे 'पालक' ही भाजी नाही बरं का!.😁पालकत्व म्हणजे जबाबदारी!शिक्षकांच्या ताब्यात काही तासच असणाऱ्या मुलांच्या प्रगती आणि विकासात खरी भूमिका असते पालकांची.आपले मूल कसे आहे,ते कसे व्हावे,त्यावर कसे संस्कार होतात अशा अनेक गोष्टी सुजाण पालकत्वावरच अवलंबुन असतात.तरच पुढे उत्तम पिढी तयार होते.शिक्षक हे मार्गदर्शक असतात तर पालक त्याला आकार देतात.म्हणूनच शिक्षक-पालक हे दोन्हीही महत्वाचे आहेत.आज"पालकपराठा" करता करता मी पालक म्हणून कशी होते याच्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.साध्या परिस्थितीतही मुलांना उत्तम संस्कार,भरपूर शिक्षण देऊ शकले,याचा नक्कीच अभिमान वाटतो.🤗.....तर असो...पालकपुराण थांबवून टेस्टी पालकपराठा कसा करायचा ते बघू ....चला तर🤗😊👍 Sushama Y. Kulkarni -
पालक राईस (palak rice recipe in marathi)
#राईस पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. पण बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. लहान मुले तर अजिबात खात नाहीत. असा भात बनवला तर नक्कीच लहानान पासून मोठ्यानं पर्यंत सर्वच आवडीने खातील. असा हा पालक राईस. Shama Mangale -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
पालक मटार भाजी (Palak Matar Bhaji Recipe In Marathi)
पालक या पालेभाजी मध्ये पौष्टिकतेचे गुण भरपूर सामावले आहेत. आजारी माणसांना पालक सूप दिले जाते. कधी कधी आपण पोळी भाजी न करता वरण-भात करतो त्या ऐवजी पालक मटार भाजी ,आणि भाताचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
-
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#cpm4 # पौष्टिक असा पालक वापरून, जास्त कुठलेही सामग्री न वापरता, पटकन होणारा, पालक पुलाव.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या